अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी स्मारक भवन, ग्रंथालय व निवासी अभ्यासिका त्वरित बांधून द्या; विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांना लहुजी साळवे स्मारक ट्रस्टने दिले निवेदन.

नागपूर: नागोराव कुडके

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त दिक्षाभूमीजवळील अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात 1 ऑगस्ट रोजी अभिवादन सभा समाजबांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.

या सभेत विधानसभा अध्यक्ष माननिय नानाभाऊ पटोले, पालकमंत्री नितीन राऊत, कैबिनेटमंत्री सुनिल केदार, आमदार विकास ठाकरे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलिस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक ट्रस्टच्या वतीने नानाभाऊ पटोले यांना पुतळ्याच्याशेजारील जागेवर  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी स्मारक भवन, ग्रंथालय व निवासी अभ्यासिका  त्वरित बांधून देण्यासंबंधीचे निवेदन दिले होते. निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत यावेऴी उपस्थित जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना नानाभाऊ पटोले म्हणाले होते की, पुढील वर्षी अभिवादन करण्यासाठी मी जेव्हा इथे येईल तेव्हा मला या जागेवर स्मारकभवन व अण्णाभाऊंच्या महान साहित्याला शोभेल असे ग्रंथालय बनून तयार दिसले पाहिजे यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी सकारात्मक होकार दिला होता.

म्हणून या मागणीचा पाठपुरावा करण्याच्या हेतूने आज दिनांक 10/08/2020 रोजी विभागीय आयुक्त माननिय डॉ. संजीवकुमार यांना आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक ट्रस्टच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

 यापुर्वी नुकतेच दिनांक 07/08/2020 रोजी ट्रस्टने जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांची भेट घेऊन नानाभाऊ पटोले यांच्या वक्तव्याची व आश्वासनाची आठवण करून देत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी स्मारक भवन, ग्रंथालय व निवासी अभ्यासिका संबंधित जागेवर त्वरित बांधून देण्याची मागणी सर्व कागदोपत्री पुराव्यासहित निवेदनाद्वारा केली होती. 

यावेळी शिष्टमंडळात आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष शरदराव जाधव, संस्थापक राजेश खंडारे, उपाध्यक्ष विनायकराव इंगोले, ज्येष्ठ समाजसेवक बुधाजी सुरकार, कोषाध्यक्ष पद्माकर बावने, सचिव शिवशंकर ताकतोडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनोद लोखंडे, गुरूदास बावने, सुधाकर बोरकर, अरूण प्रधान, सागर जाधव, वैभव इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *