स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त खा.सुधाकर शृंगारे यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास आरोग्य साहित्याची भेट !

कंधार ;ॲड सागर डोंगरजकर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोराञ कोरोना योद्धा म्हणून आपली प्रमुख भूमिका बजावणारे डॉक्टर,आरोग्य सेवक व सेविका यांच्या करीता ग्रामीण रुग्णालयास हँन्डग्लोज व मास्क अशा आरोग्य साहित्याची भेट लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या वतीने देण्यात आले.
स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला यशस्वी सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा उपक्रम राबविण्यात आला. बुधवारी ( दि. २ जून रोजी) कंधारच्या ग्रामीण रुग्णालयास N 95 मास्क व हँन्डग्लोज दोन महिने पुरेल असे आरोग्य साहित्य भेट देण्यात आले.


भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा हे संघटन हेच ध्येय ठेवून प्रत्येक कार्यकर्ता ते लोकप्रतिनिधी काम करीत आहेत. त्या अनुषंगाने लोकनेते स्व गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथी निमीत्त लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या वतीने दि २ जून रोजी ग्रामीण रुग्णालय कंधार व कोविड सेंटर कंधार येथे मास्क व हँड ग्लोज देण्यात आले.यावेळी खा.श्रृंगारे यांचे स्वीय सहायक संग्राम वाघमारे भाजपा शहराध्यक्ष ॲड गंगाप्रसाद यन्नावार ,सरचिटणीस मधुकर डांगे,सोशल मीडिया प्रमुख ॲड सागर डोंगरकर,प्रवीण बनसोडे ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉक्टर राजेश टोम्पे,डॉ महेश पोकळे,डॉ संतोष पदमवार,डॉ गजानन पवार,वसंत केंद्रे,बालाजी टेकाळे,राजेश वाघमारे, माणिक ढवळे सह आदी उपस्थित होते.

खा.सुधाकर श्रृंगारे यांनी दिलेला शब्द पाळला!

खा.सुधाकर श्रृंगारे हे कंधार दौऱ्यावर आले असता त्यांनी ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटरची पाहणी केली.तेथील काही अडचणी समस्या असतील तर आरोग्य विभागाकडून कळविण्यात यावे व आरोग्य विषयक साहित्याची मागणी करावी असे म्हटले होते.तेव्हा आम्ही N 95 मास्क व हँन्ड ग्लोजचा तुटवडा असून ते आम्हाला मिळावेत अशी मागणी करताच त्यांनी विलंब न लावता दोनच दिवसात त्या साहित्याची उपलब्धता करुन देवून दोन महिने पुरेल असे आरोग्य साहित्य भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *