कंधार/प्रतिनिधी
निवेदनात म्हटले की, २ जुन २०१४ रोजी काही समाजकंटकांनी सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर त्या पोस्टचा आधार घेत हिंदुराष्ट्रसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून निष्पाप व निरपराध असलेल्या व त्या पोस्टशी काहीही सबंध न सॉफ्टवेअर इंजीनिअर मोहसीन शेखची हत्या केली होती. आज
सात वर्ष झाले त्यागंभीर घटनेला मात्र अजून पर्यंत पीडिताच्या परिवाराला न्याय भेटलेला नाही. याचा निषेध करत कंधार ऑल इंडिया तन्ज़ीम ए इन्साफच्यावतीने जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांच्या आदेशावरून तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवन्यात आले.
यावेळी तन्जीम ए इन्साफ संघटनेचे कंधार तालुका अध्यक्ष शेख शादुलभाई, शेख सर , आदी उपस्थित होते.