कंधार ; प्रतीनिधी
आज दि.३ जुन रोजी गटसाधन केंद्र कंधार येथे ‘सुंदर माझे कार्यालय’ आढावा बैठकीसाठी शिक्षण तथा बांधकाम सभापती आदरणीय संजयजी बेळगे यांनी भेट दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष घोरबांड लक्ष्मीबाई घोरबांड प्रमुख पाहुणे म्हणुन संजयजी बेळगे ,काँग्रेस तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे ,शिक्षणाधिकारी माधव मसलगे,शिक्षणाधिकारी प्रा. प्रशांत दिग्रसकर ,पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण,पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे, काँग्रेस सचिव बाळासाहेब पवार,काँग्रेस सोशल मीडिया तालुकाध्यक्ष सतीश देवकत्ते,गटशिक्षणाधिकारी सोनटक्के ,

शिक्षण विस्तार अधिकारी मठपती ,दत्ता पाटील घोरबांड व अजिंक्य पांडागळे यांच्यासह कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,केंद्र मुख्याध्यापक यासह शिक्षक बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन गटशिक्षणाधिकारी संजय येरमे यांनी केले. यावेळी सतिश व्यवहारे,वसंत मेटकर,कैलास होनधरणे लोहा येथिल गटशिक्षणअधिकारी रविंद्र सोनटक्के आदीसह सर्व केंद्र प्रमुख आदीची यावेळी उपस्थिती होती.
