कोरोना महामारीने जगात हाहाकार माजविला आहे. लोकांना एकमेकांना तोंड दाखण्याची, सुख दुःखात सहभागी होण्याचे क्षण ही या महामारीने आपल्यापासुन हिरावून घेतलेले आहेत. यात नातंही शिल्लक राहीलं नाही. जवळचे अनेक गेले. आहो तोंड पहाता आले नाही. “आरे तो/ती गेला/गेली म्हणे” येवढेच शब्द तोंडातून बाहेर पडतात. कुठेतरी दोनाक्षरे लिहीतोत “भावपूर्ण श्रद्धांजली” वगैरे. जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झालेला आहे. एक वेळच्या जेवनासाठी काहीची धडपड चालू आहे. हाताला काम नाही पोटाला भाकर नाही. निसर्ग सर्व मानव जातीची कठोर कडक परीक्षा घेत आहे. आरोग्यातील सर्व अधिकारी कर्मचारी व पोलीस विभाग आपले पर्यवेक्षक आहेत. जीवाची पर्वा नकरता ते या कठीन काळात आपल्या कठिन कडक परीक्षेत आपण उत्तीर्ण व्हावेत म्हणून ते आपल्यासाठी झटत आहेत जीवच रान करत आहेत.
प्रत्यक्ष अमलबाजाणी करणारे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक ही यात हिरहिरीने भाग घेतलेला आहे. काही अपवाद असू शकतात बरं. पण सर्व गुरुजन वर्ग विद्यार्थ्यांसाठी मनापासून धडपड करताना मी पहिलेलं आहे. पण शाळा बंद शिक्षण चालू हे कोठपर्यंत पोहचले? कोणापर्यंत पोहचले? किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले? याचा विचार कोणीही केलेला दिसून येत नाही. संकट काळात शिक्षक वर्ग व त्यांच्या अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न मात्र निश्चितच अभिनंदीय व कौतुकास पात्र आहेत. शहरातील बरेच विद्यार्थी यात सहभागी झालेले अहेत यात वाद नाही. पण या शिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी मात्र समाधानकारक नाही असे वाटते.
हे शिक्षण चालू झाले तेव्हा याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. माझ्या गावाच्या जि.प.हा. शाळेत पहिली ते दहावी दिड हजाराच्या जवळपास विद्यार्थी संख्या असेल पण सुरुवातीला मुले ऑनलाईन शिक्षणात फारसे रस दाखवत नव्हते. शिक्षक मात्र हिरहिरीने मुलांना यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देत होते हे निश्चित. एक उदाहरण म्हणून सांगतोय सुरुवातीला इयत्ता सहावीत साठ मुले असतील तर दहा बाराच मुलांनी ऑनलाईन वर्ग जॉईन केले. खेडेगावात तर फारच वेगळे चित्र आहे. एका गावाच्या शाळेत साडेतीनशे मुलं पण ऑनलाईन शिक्षणाकरिता पस्तीस मुलचं जॉईन झाले होते. तर एका शाळेत जवळपास पस्तीत विद्यार्थी संख्या ऑनलाईन उपस्थिती चार पाच विद्यार्थी. कदाचीत अशीच परिस्थिती जिल्हाभर राज्यभर ही असेल नाही का?
असे का घडले? यात शिक्षक वर्ग कमी पडले की अधिकारी वर्ग? या प्रश्नाचे उत्तर “नाही” असंच येईल. यात कमी पडले ते ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक वर्ग. असं का घडलं असेल? याची वेगवेगळी कारणं आहेत.
१) ग्रामीण भाग, वाडी, तांडे व पाडे यात शिक्षणासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा नाहीत. खेडे गावापर्यंत वाडी तांड्या पर्यंत मोबाईल पोहचलेला आहे. आणि हे सत्यही आहे पण त्यांच्या कडे साधे मोबाईल आहेत या मोबाईलचा उपयोग विद्यार्थ्यांना झालेला नाही.
२) काही पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल्स आहेत. पण ते कामासाठी घराबाहेर जातात व जाताना मोबाईल सोबत घेवून जातात. दिवसभर मोबाईल पालकांकडेच असतो. त्याच्या पाल्यांना त्याचा काहीही उपयोग होत नाही.
३) संध्याकाळी पालक परत आल्यानंतर त्याच्या पाल्यांना मोबाईल दिलेतरी तो क्लास करण्या ऐवजी इतर गोष्टी पहाण्यातच वेळ घालवतो. येथे पाल्याप्रति पालकांची निष्काळजीपणा दिसून येते.
४) खेडेगावात मोबाईल उपलब्ध झालं तरी नेटवर्कचा प्रश्न उद्धभवतो. तसेच तीन तीन दिवस विज बंद असते. यामुळे मोबाईल्सला चार्जिंग करता येत नाही. शाळाबंद शिक्षण चालू या काळात नेटचा उपयोगही अति झाले त्यामुळेही हा प्रश्न निर्माण झालं. डेटा पॅक मारण्यासाठी पालकांकडे पैशाची चनचन होती, त्यामुळे काही विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहिले. काही ठिकाणी नेटवर्क चालू बंद होत असल्यामुळे छोटे विद्यार्थी कंटाळून या शिक्षणापासून चार हात चार पावलं दूरच राहीले.
५) खेडेगावात या काळात बऱ्याच पालकांनी नकारार्थी भुमिका घेतली. प्रत्यक्ष वर्गात शिकत नाही तर येथे मोबाईलवर कसे शिकणार……. या वृतीमुळे पालकांनी मुलांकडे फारशे लक्ष दिले नाही. दिवसभर शेतात राबराब राबून आलेले मातापिता व फक्त मोबाईल आल्यानंतर फक्त उचलणारे पालक या शैक्षणिक योजनेकडे दुर्लक्ष केले.
६) शिक्षक व शिक्षण तज्ज्ञ ही Student व pupil या मधील भेद विसरून गेले. या शिक्षणात सर्वांना एकाच मापात मोजले गेले. खरंतर ‘student’ व ‘pupil’ या मध्ये फरक आहे. Student म्हणजे शिक्षण घेताना ज्यांना शिक्षकांची गरज पडत नाही ते स्वतःहून शिक्षण घेवू शकतात. चांगले वाईट त्यांना कळू शकते. जे शिक्षकांविना शिक्षण घेवू शकतात ते “student”. असा student या शब्दाचा अर्थ आहे. Pupil म्हणजे ज्यांना मार्गदर्शनाची मार्गदर्शकांची गरज असते. मार्गदर्शकाशिवाय ते (गुरुजी) शिक्षण घेवू शकत नाही ते “pupil “. या नुसार विद्यापीठात शिकणारे ते student व बोर्ड परीक्षा देणारे बोर्ड पर्यंतचे सर्व विद्यार्थी म्हणजे pupil. शाळाबंद शिक्षण चालू मध्ये सर्वच student आहेत. Pupil कडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे.
७) आपण विद्यार्थ्यांत शिक्षण देताना फरक केलेलं नाही. पण इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना गप्प बसा गप्प बसा म्हणण्यात आम्हा शिक्षकांचा वेळ जातो तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना बोला बोला म्हणण्यात वेळ जातो. हे विधार्थी खरंच ऑन लाईन शिक्षण घेतले असतील का? मला वाटते पहिले ते सातवी पर्यंत तरी या शिक्षण देणाऱ्या पद्धतीचा उपयोग झालेला नाही. प्रत्यक्ष गुरुजी त्याच्या समोरअसताना जो शांत बसत नाही. ते मोबाईल वर शिक्षण घेणं आजतरी कठीण वाटते.
शाळा बंद शिक्षण चालू या यांत्रिक शिक्षण पद्धतीत खेडे गावातील मुले खूपच मागे पडलेले आहेत तर वाडी तांड्यातील मुलांना याचं फारसं देणेघेणे नव्हतेच व नाही. ही मुलंतर सकाळ पासून संध्याकाळपर्यंत आई वडीलांच्या कामात हातभार लावत आहेत. मजूरांची मुलं मजूरी करित आहेत. या कोरोना महामारी मुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावले गेले. पहिलीत जाणाऱ्या मुलांना गुरुजी व शाळा काय आहे ते अद्यापी कळालेलच नाही. शाळेतील आनंदापासून ते सर्वजण दुरावलेले आहेत. याचं पहिलीचं वर्ष वाया गेले. आज याचे परिणाम जाणवणार नाहीत. पण भविष्याचं काय? हे जग स्पर्धेचं आहे. या स्पर्धेच्या युगात वयही महत्वाचं आहे. एक वर्षानी मागे म्हणजे भविष्यात एका पिढीने हे मुले मागे पडल्या सारखे होतील. या विषयी शासनाने विचार करावयास पाहिजे. शिक्षक समाज यांनी ही विचार करावयास पाहिजे.
या महामारीमुळे शाळा बंद. शाळा नाही तर सासरी नांदा या न्यायाने, या काळात बहुसंख्य मुली या बालविवाहाच्या बळी ठरल्या आहेत. ग्रामीण भागातील पालक “गुपचूप विवाह” पद्धतीचा अवलंब करून लहान मुलींचे लग्न उरकून घेत आहेत. डोक्यावरचा भार कमी झालं असे त्यांना वाटत आहे. पण या मुळे निष्पाप जीवांचे मात्र हालहाल होणारे आहेत. भविष्यात याचे दूरगामी दुष्परिणाम दिसणार आहेत.
या कोरोनाने चोहीकडे माणसांच माकड केलेलं आहे तर शिक्षणाचं पालापाचोळा करून पिढी बरबाद करत आहे. सगळी कडेच हेडंगा लावलय या करोनान.
शाळा बंद शिक्षण चालू यात काम करणारे सर्व गुरुजन वर्ग व अधिकारी वर्ग मात्र अभिनंदानास व कौतुकास पात्र आहेत. गुरु लगे रहो. देशाचे तारक तुम्हीच आहात .आतापर्यंत खरा भारत तुम्ही वर्गात घडवत होतात आता मोबाईलवर घडवा.
राठोड मोतीराम रुपसिंग
“गोमती सावली”, काळेश्वरनगर,
विष्णुपूरी, नांदेड-६
९९२२६५२४०७.