कंधार येथील कोविड केअर सेंटर यशस्वीपणे बंद ; वैद्यकीय अधिक्षक डॉ लोणीकर यांची कौतुकास्पद कामगिरी

कंधार ; प्रतिनिधी

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लोणीकर सर यांच्या कार्यकाळात
कोविड केअर सेंटरची सुरुवात दि:-१५/०३/२०२१ रोजी झाली कोविड या महाभयंकर आजाराची आतापर्यंत कोविड रुग्ण दाखल झालेली संख्या एकूण:-३६० कोविड केअर सेंटरमधून सुट्टी मिळालेले रुग्ण एकूण:-२०५ संदर्भित केलेले रुग्ण एकूण:-१५५ तसेच गृहवीलगिकरण एकूण रुग्ण :-२७० गृहविलगीकरण झालेले रुग्णांना सुट्टी एकूण :-२७० आतापर्यंत RTPCR तपासणी केलेली रुग्णसंख्या एकूण:-७४९४ व RTPCR, Positive रुग्ण संख्या एकूण :-१२३५ तसेच रॅपिड अँटीजन तपासणी रुग्ण संख्या एकूण:-३३०१ व रॅपिड अँटीजन Positve रुग्ण संख्या एकूण:-२७८ RTPCR, रॅपिड अँटीजन संख्या दोनीही तपासणी केलेल्या Positive रुग्ण संख्या एकूण:-१५१३ तसेच RTPCR, रॅपिड अँटीजन तपासणी दोनीही तपासण्या केलेली रुग्ण संख्या एकूण :-१०,६९५ झाली असून आतापर्यंत कंधार कोविड केअर सेंटरमधून एकही रुग्ण मरण पावला नाही तेथिल डॉक्टर व नर्स कर्मचारी रुग्णांला उपचार करून त्यांची काळजी घेत होते त्यामुळे तेथिल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनि त्यांना औषध उपचार करून रुग्णांना बरे करून रुग्णांना सुट्टी दिली.


कंधार कोविड केअर सेंटरमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.लोणीकर सर यांनी रोज रुग्णांना भेट देऊन त्यांना औषध उपचाराबद्दल विचारपूस करून ते रुग्णांना तपासून त्यांना मार्गदर्शन करून राउंड घेऊन जात होते .तसेच कंधार कोविड केअर सेंटर येथील ,डॉ. माया लुंगारे मॅडम,, डॉ. अंजली मरशिवणे ,डॉ पदमवार,डॉ गुत्ते,डॉ वर्षा कन्धारे,डॉ. श्रीकांत मोरे ,डॉ. अरुंकुमार राठोड ,डॉ. ढोणे मॅडम,तसेच कर्मचारी
श्रीमती. पल्लवी सोनकांबळे
श्रीमंती. अंजली कदम ,
श्रीमती.मनीषा वाघमारे ,
श्रीमती.शोभा गायकवाड श्रीमती.झुंजूरवार राणी,
श्री.सुशील धनसडे ,
श्री.परमेश्वर वाघमारे,पद्रे,शेलके
लब टेक.ढवळे,पेट्कर,काळे व
सफाई कर्मचारी
ह्या सर्वांनी अतिशय चागल्या प्रकारे रुग्णांना सेवा दिली.सध्या पाहता कोविड रुग्ण आटोक्यात आले असून तपासणी दरम्यान रुग्ण संख्या अतिशय कमी होत आहे .


त्यामुळे बंद आदेश मा.जिल्हा अधिकारी साहेब नांदेड यांचे पत्र आणि मा.जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय नांदेड याचे पत्र दि:३१/०५/२०२१ रोजी दुतीय समयी कार्यमुक्त करण्याचे पत्र ग्रामीण रुग्णालय कंधार येथे आल्यामुळे सदरील कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लोणीकर सर यांनी ग्रामीण रुग्णालयात निरोप संमारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कोविड केअर सेंटरमध्ये काम केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कोविड योद्धाचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करून गौरव करण्यात आला.
उपस्थित सर्व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *