आजच्या अहवालानुसार 8 जून 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे पौर्णिमानगर येथील 45 वर्षाचा पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 894 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 27, कंधार 1, नायगाव 1, परभणी 2, नांदेड ग्रामणीण 16, किनवट 3, माहूर 1, यवतमाळ 1, अर्धापूर 1, लोहा 3, मुदखेड 1, हिंगोली 1, हदगाव 2, मुखेड 4, उमरी 1, तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 36, हदगाव 3, मुखेड 2, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 14, हिमायतनगर 1, उमरी 2, वाशिम 2, वाशिम 1, अर्धापूर 1, कंधार 1, परभणी 2, देगलूर 3, लोहा 3, हिंगोली 2, असे एकूण 138 बाधित आढळले.
आज जिल्ह्यातील 146 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 2, मुखेड कोविड रुग्णालय 1, अर्धापूर तालुक्यातर्गंत 1, भोकर तालुक्यातर्गंत 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, माहूर तालुक्यातर्गत 4, हिमायतनगर तालुक्यातर्गत 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 107, किनवट कोविड रुग्णालय 1, बिलोली तालुक्यातंर्गत 1, खाजगी रुग्णालय 18 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आज 639 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 37, लोहा कोविड रुग्णालय 3, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 1, किनवट कोविड रुग्णालय 19, देगलूर कोविड रुग्णालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 367, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 135, खाजगी रुग्णालय 40 व्यक्ती उपचार घेत आहेत.
आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 109, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 120 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 66 हजार 164
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 63 हजार 944
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 699
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 261
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 894
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.62 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-40
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-263
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 639
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14
00000