गंगापूर- AiMiM पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर तहसील समोर धरणे आंदोलन करण्यात आले*
यावेळी केंद्रसरकार, व राज्य सरकार यांच्या धोरनांचा निषेध करण्यात आला व यावेळी नायब तहसीलदार श्री अंकुश यांना निवेदन देण्यात आले व हे निवेदन गंगापूर तहसीलदार यांच्या मार्फत
1) मा.केंद्रीय सचिव
पेट्रोलियम विभाग, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया,न्यू दिल्ली.
2) मा.सचिव
विक्रीकर विभाग ,
महाराष्ट्र शासन मुंबई. यांना पाठवले असून त्यात म्हटले आहे की, पेट्रोल ,डिझेल , खाद्यतेल हे आजच्या परिस्थितीमध्ये जीवनावश्यक वस्तू झाली असून, केंद्रसरकार पेट्रोल प्रति लिटर 33 रुपये, व डिझेल 32 रुपये प्रति लिटर टॅक्स आकारत असून, राज्य शासन व्हॅट च्या नावाखाली 25 टक्के प्रति लिटर पेट्रोल व 22 टक्के प्रति लिटर डिझेल यावर कर आकारत आहे. ही वस्तू स्थिती 15 मार्च च्या डेटा नुसार आहे.
व तसेच केंद्र व राज्य सरकारने मिळून खाद्यतेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्या मुळे सर्व सामान्य व गरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे.
या देशातील मध्यमवर्गीय, शेतकरी, कष्टकरी कामगार, यांनी जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाला असून केंद्रसरकार व राज्य सरकार यांनी पेट्रोल, डिझेल ,व खाद्यतेलाचे भाव 25 टक्क्यांपर्यंत कपात करावे अशी मागणी आपणास AimiM पक्षाच्या वतीने करण्यात येत असून आमची मागणी निवेदन केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय व राज्य विक्रीकर खात्याला पाठवून उपकृत करावे. असे AiMiM पक्षाने म्हटले आहे.
या निवेदनावर राहुल वानखेडे, फैसल बासोलान ,वैभव खाजेकर, डॉ शाकेर चाऊस, अशपाक सय्यद, अशपाक पटेल, बाबा पटेल, जुनेद शेख, अजित जाधव, अँड मयूर मोकळे, सरपंच आसिफ पटेल योगेश साळवे , राजेक शेख, छोटू पठाण, अक्रम बेग,इम्रान खान, हुसेन पठाण, जावेद पटेल, महेबूब सय्यद, अजीज सय्यद,मुबिन शेख , सरवर जहुरी, सुरजकुमार नरवडे जुबेर सिद्दीकी, सोहेल पटेल, नदीम हाशमी, मोहसीन शेख, सलीम सय्यद, अजय मावस, मोहसीन पठाण,साजीद पठाण, ईसा पटेल, गब्बर पटेल, हाकीम शेख , जमीर शेख, इम्रान शेख, फजल शेख, जाकेर सय्यद, हारून शेख, अमजद पठाण ,सलमान बागवान,जावेद शेख, महेबूब पठाण,अभय बागुल, श्याम शहाणे, असद पठाण युनूस पटेल , रफिक पटेल, तय्यब शेख, मुश्ताक बेग, नुमान खान, फेरोज पठाण, अकबर पठाण ,शाकेर शेख, इर्शाद पटेल ,अल्ताफ शेख, आदींची उपस्थिती होती.