इनामी जमीन परस्पर लावणाऱ्या दोषी विरुद्ध गुन्हे दाखल करून न्याय द्या – लोहा तहसील समोर आमरण उपोषण सुरू

लोहा/प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील येथील जुना सर्वे नंबर मधील तब्बल २६-२४ आर इनामी शेतजमीन हेराफेरी करीत लाखो रुपयांची आर्थिक व्यवहार करून दुसऱ्यांच्या नावे केली आहे आणि या क्षेत्रातील वारसदारांना. हक्क दारांना बेदखल केले आहे. सदर इनामी शेत जमीन पूर्ववत नावाने करीत तात्काळ सातबारा हाती द्या अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हा नोंद करून अटक करा. या मागणीसाठी लव्हराळ येथील लक्ष्मण श्रीमंगले या शेतकऱ्याने लोहा तहसील समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

लव्हराळ ता.लोहा यथे जुना ६५ सर्वे नंबर असून त्यातील २६२४ आर इनामी शेतजमीन इनाम म्हणून १९६०दरम्यान केरबा दशरथ श्रीमंगले यांना प्रदान करण्यात आली. त्यानुसार लोहा तहसीलच्या दप्तरी स्पष्ट नोंद आहे. ही इनामी जमीन जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय विक्री व हस्तांतर करता येत नाही. तरीही श्रीमंगले परिवारातील कुणाचीही सही व अंगठा न घेता तत्कालीन मंडळ अधिकारी भोसीकर,तलाठी व संबंधित अधिकारी यांनी लाखो रुपयाचा गैरअर्थिक व्यवहार करीत कुठलाही आधार आणि संबंध नसताना ही शेत जमीन दुसऱ्यांच्या नावे केली या क्षेत्रातून श्रीमंगले परिवाराला हद्दपार करून जीवे मारण्याची धमकी देऊन गावाबाहेर हाकलून दिले २६२४ आर ही हक्काची शेत जमीन असताना श्रीमंगले परिवाराला फक्त ००.०४आर गुंठ्यावर आणून ठेवले आहे सदर शेत जमीन श्रीमंगले परिवाराची असून या कुटुंबाने पूर्वापार ते आजतागायत शासनाचे अनुदान उचललेले आहे. या इनामी शेत जमीन प्रकरणी लोहा तहसीलदार यांनी श्रीमंगले यांच्या कुटुंबाच्या नावे शेत जमीन पूर्ववत करून प्रत्यक्ष सातबारा द्यावी दोषी अधिकाऱ्यावर पोलिसात गुन्हा नोंद करून तात्काळ चौकशी करून अटक करावी या मागणीसाठी लक्ष्मण श्रीमंगले या लव्हराळ येथील शेतकरी लक्ष्मण धोंडिबा श्रीमंगले यांनी लोहा तहसील कार्यालया समोर दि.२१जुन२०२१रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *