कंधार ; प्रतिनिधी
कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत तंत्रज्ञान सप्ताह दिनांक २१ जून २०२१ते १जुलै २०२१ या मोहिमेचा शुभारंभ माननीय आमदार श्री श्यामसुंदर शिंदे यांच्या शुभहस्ते मौजे घोडज तालुका कंधार येथे करण्यात आला.
या शुभारंभ प्रसंगी तालुक्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे प्रभारी गटविकास अधिकारी बळवंत तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख मंडळ कृषी अधिकारी पेठवडज विकास नारळीकर मंडळ कृषी अधिकारी बारूळ रमाकांत भुरे यांच्यासह कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती कंधारचे ज्ञानेश्वर चौंडे यांची प्रमुख उपस्थिती होती घोडज येथील कृषी सहाय्यक माधव गुट्टे ग्रामसेवक भायेगावे तलाठी केंद्रे यांची उपस्थिती होती .
या कार्यक्रमांतर्गत कृषी विभागाच्या वतीने संपूर्ण सप्ताहात विविध विषयांवर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन होणार असून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी कंधार रमेश देशमुख यांनी केले त्यांनी पुढे बोलताना तालुक्यात रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड लागवड फारशी होत नव्हती कृषी विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मागील वर्षी १५० हे. वर तर यावर्षी १००० हे. क्षेत्रावर अशा पद्धतीने लागवड करण्यासाठी कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असल्याचे सांगितले.
प्राथमिक अवस्थेतील कीड व रोग यावर प्रभावी उपाययोजना म्हणून बीजप्रक्रियेचे अनन्नसाधारण महत्व असून सर्व शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच बियाण्याची पेरणी करावी सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया व त्यानंतर जैविक बीजप्रक्रिया करण्याबाबत मार्गदर्शन केले याबाबतीत सभास्थळी बीज प्रक्रियाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले त्यामध्ये तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार कृषी सहायक संजय माळी यांनी प्रात्यक्षिकाद्वारे बीज प्रक्रिया करून दाखवले, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले ,कापूस पिकात एक गाव एक वाण यामध्ये तालुक्यात एकूण सहा गावांची निवड झाली असून शेतकऱ्यांना या बाबतीत मार्गदर्शन करण्यात येत आहे व एकाच प्रतीचा चांगला स्वच्छ कापूस तयार करून विक्री करण्याच्या नियोजन करण्यात येत आहे,विकेल ते पिकेल, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, तालुक्यातील दोन पिकाची उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकर्यांचा सहभाग, तालुक्यातील महत्त्वाच्या पिकांवरील कीड रोग नियंत्रणाच्या उपाय योजना क्रॉपसॅपच्या माध्यमातून होणारी उपाययोजना याबाबतही विस्तृत माहिती दिली,
१ जुलै रोजी कृषी दिन आणि मोहिमेचा समारोप कार्यक्रम अशा पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती तसेच ऑनलाइन अर्ज करण्याबाबतची माहिती देण्यात आली. कंधार तालुक्यातील बारुळ, पेठवडज, कंधार या तिनही मंडळ कृषी अधिकारी कार्यक्षेत्राअंतर्गत कृषी संजीवनी सप्ताहाची सुरुवात दिनांक २१ जून रोजी करण्यात आली असून तालुक्यातील गावात क्षेत्रीय अधिकारी,कर्मचारी यांच्यामार्फत हा जनजागृतीचा प्रसार प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याचे सांगितले.
तहसीलदार वेंकटेश मुंडे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कृषी विभागाचे अभिनंदन केले या उपक्रमाला शुभेच्छा देत खरीप हंगामाच्या शुभेच्छा दिल्या सर्व शेतकरी बांधवांना या सप्ताहामुळे निश्चितच फायदा होईल असे सांगितले.
माननीय आमदार शामसुंदर शिंदे यांनी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन व शुभारंभ झाल्याचे घोषित केले त्यांनी आपल्या भाषणात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या शेतकरी बांधवांना सर्व क्षेत्रीय कर्मचारी अधिकाऱ्यांमार्फत जनजागृती करून उत्पादकता वाढीमध्ये या सर्व बाबींचा फायदा होईल असे सांगितले कृषी मालाची विक्री व विपणन होण्यासाठी तसेच उत्पादकता वाढीसाठी सिंचनाची व्यवस्था त्याचबरोबर दळणवळणाची व्यवस्था चांगली असणे यावर त्यांनी भर दिला आणि यापुढील काळात या दोन्ही बाबींवर लक्ष केंद्रित करून याबाबत विकास करण्यासाठी भर राहील असे सांगितले.पिक विम्याच्या संदर्भात त्यांनी ही योजना शेतकऱ्यांसाठी अधिक लाभदायक कशी ठरेल याबाबतीत अभ्यासपूर्ण मांडणी करून या विम्याचा फायदा कसा होईल यासाठी विधानसभेत प्रयत्न करू असे सांगितले याप्रसंगी घोडजचा बालाजी लाडेकर याची लष्करात निवड झाल्याबद्दल आमदार महोदयांनी स्वहस्ते त्याचा सत्कार केला व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.त्याच्या या निवडीचा सार्थ अभिमान वाटतो असे सांगितले.घोडज येथील राष्ट्रपती शौर्य पदक विजेता कामेश्वर घोडजकर याचाही सत्कार करण्यात आला या दोघांबाबतीत आमदार महोदयांनी गौरवोद्गार काढून विविध माध्यमाद्वारे शासकीय योजनांचा यांना फायदा कसा होईल याबाबतीत प्रयत्न करत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा योग्य दरात मिळाव्यात , शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले तसेच या निविष्ठांचा काळाबाजार होणार नाही शेतकऱ्यांना योग्य भावात निविष्ठा मिळतील या बाबीकडे तालुका प्रशासनासह कृषी विभागाने लक्ष द्यावे अशी सूचना केली. या वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांना चांगला जाईल अशा शुभेच्छा व्यक्त केल्या व अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कृषी विभागाचे कर्मचारी अधिकारी यांचे त्यांनी अभिनंदन केले यावेळी बोरीचे सरपंच रामकिशन पंदनवाड गंगनबीडचे सरपंच व्यंकटी राहेरकर बाभुळगावचे सरपंच रामदास भिसे याच गावचे शेतकरी किशनराव डांगे घोडजचे उपसरपंच आत्माराम लाडेकर माजी सरपंच नागोराव लाडेकर यांच्यासह गावातील शेतकरी प्रगतशील शेतकरी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.