मतदार संघातील शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी मोहिमेचा लाभ घ्यावा; आमदार श्यामसुंदर शिंदे

घोडज येथे आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ

कंधार (प्रतिनिधी)
लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते तालुक्यातील घोडज येथे कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, गटविकास अधिकारी बळवंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, मंडळअधिकारी नाराळकर, सरपंच सौ. कुंता ज्ञानेश्वर चोंडे, प्रमुख उपस्थित होते. या वेळी ऊस लागवड तंत्रज्ञान ,खतांचा संतुलित वापर, कापूस एक गाव एक वाण, विकेल ते पिकेल, फळबाग लागवड, कीड नियंत्रण,या सह कृषी विभागाच्या महत्त्वपूर्ण योजना विषयी कृषी अधिकारी व आमदार शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शनकरण्यात आले,

या कृषी संजीवनी मोहिमेचा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार शामसुंदर शिंदे यांनी बोलताना केले ,यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की लोहा, कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यात येतील व शेतकऱ्यांच्या शेतमालाला कायमस्वरूपी मोठी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. यावेळी उपसरपंच आत्माराम लाडेकर, चेअरमन नारायण चोंडे, कोंडीबा पाटील मोरे, शिवाजी चोंडे, प्रभाकर जाधव, सखाराम लाडेकर, भीमराव लाडेकर, कृषी पर्यवेक्षक रोहिणी पवार, कृषी सहायक जाधव ,गुट्टे,सह गावकरी मंडळी उपस्थित होते .

कंधार तालुक्यातील महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या घोडज ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन यावेळी लोहा ,कंधार चे लोकप्रिय आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,गट विकास अधिकारी बळवंत, कंधार बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, सरपंच सौ. कुंता ज्ञानेश्वर पाटील चोंडे, उपसरपंच आत्माराम लाडेकर, चेअरमन नारायण चोंडे, सह प्रमुख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *