पंचायत समिती कंधार अंतर्गत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
कंधारः प्रतिनिधी
पंचायत समिती कंधार अंतर्गत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने गटसाधन केंद्र कंधार येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना काळात योगामुळे अनेकांचे प्राण वाचले ,केवळ एका दिवसासाठी योगा नाही तर शिक्षकांनी आयुष्यभर शाळातून योगाची धडे द्यावीत व कंधार तालुक्याचा योगाचा पँटर्न शिक्षण क्षेत्रात निर्माण करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांनी कंधार येथे केले.
दि.२१ जुन रोजी योगवर्ग सकाळी ठिक साडे सहा ते आडेआठ या वेळेत संपन्न झाला. यावेळी कंधार तालूक्यातील जवळजवळ 14 केंद्रातील 200 शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
कंधार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा योगशिक्षक संजयजी येरमे , पतंजली योग समिती कंधारचे तालुकाप्रभारी नीळकंठ मोरे , योगशिक्षक किशन केंद्रे यांनी आयुष मंत्रालय भारत सरकारच्या योग प्रोटोकॉलनुसार विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा उपस्थित शिक्षकांकडून करून घेऊन योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी राजेश्वर पांडे ,अंजली कापसे मॕडम,कैलास होनधरणे ,वसंत मेटकर तसेच विविध केंद्राचे केंद्रप्रमुख सुर्यकांत मंगनाळे,उल्हास चव्हाण,
निवृत्ती वाघमारे,उद्धव सुर्यवंशी,माधव कांबळे, बालाजी केंद्रे,प्रदिप गिते,कनशेट्टे सर धोंडिबा गुंटूरे आदीची उपस्थिती यावेळी उपस्थिती होती.