लोहा ;प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार आज दि.२६ जुन रोजी कंधार लोहा च्या वतीने लोहा येथे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रविण पाटिल चिखलीकर व भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. प्रणिताताई चिखलीकर यांच्या नेतृत्वात लोहा येथील भाजी मंडई चौक या ठिकाणी “चक्का जाम आंदोलन” करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.
या आंदोलनात भाजपा चे विविध आघाडी चे अध्यक्ष पदाधिकारी ,नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, उपनगराध्यक्ष जफर बाहोद्दीन, शरद पवार ,सभापती,महिला जिल्हाध्यक्ष महिला पदाधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
यावेळी ओबीसी आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणावर घोषणाबाजी करत राज्यसरकारचा निषेध केला. यावेळी प्रणिता ताई चिखलीकर, प्रविण पाटिल चिखलीकर, नरेंद्र गायकवाड, भगवान राठोड, वारकड गुरुजी यांनीओबीसी आरक्षणाची सध्याची परिस्थिती विशद केली.
…आरक्षण…चक्काजाम
यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भाजपा कंधार ,लोहा तालुक्याच्या वतीने रद्द झालेले ओबीसी चे राजकीय आरक्षण हक्काचे असून ओबीसी बांधवांना तो मिळालच पाहिजे या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस मा.प्रवीण पाटील चिखलीकर , भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा, मा .सौ .प्रणिता ताई देवरे चिखलीकर, व दोन्ही तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.