ये पब्लीक है सब जाणती है….!

भारत देश विविधतेने नटलेला सजलेला. येथे अनेक जाती, धर्म, पंथ संप्रदायाचे लोक भलत्याच गुण्यागोविंदाने नांदत होते व नांदत आहे. सगळं भारत देश बाहेरच्या पाहुण्यानां विविध रंगीत फुलपाखरा प्रमाणे वाटते. सर्वच कसं स्वच्छंदीपणे जीवन जगतात याचही नवल बाहेरच्यानां वाटत असेल व वाटते. जशा निसर्गाच्या विविध रंगाच्या छटा तशाच भारतात लोकांच्या मनाच्या छटा आहेत. भारतीय समाजाच्या मनावर विविध जाती धर्माचे विविध नविन कंगोरे, नविन पालवी फुटत आहेत. त्या पालवीचं आकार, रुप, धारणा मात्र वेगवेगळ्या दिशेने झपाट्याने वाढत आहेत. जोरात फोफावत आहेत.

कोरोनाने थैमान घालत भारतीय लोकांना चितपट करत आहे. गरिब लोक पोटापाण्यासाठी हैराण आहेत. आजचा दिवस कसा जाईल हा प्रश्न त्यांच्या समोर दत्त म्हणुन उभा आहे. राजकारणी लोक या गरीबांची व गरिबीची मजा घेण्यात दंग आहेत. यांना कोरोनाशी देणंघेणं नाही. लोकांच्या आडीआडचणी समस्या याचं काहीही यानां देणंघेणं नाही. यांना फक्त संधी साधू राजकारण करावयाचे आहे. लोकाच्या कल्यानापेक्षा यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसते व त्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करणं महत्वाचं आहे असे वाटते.

महागाई, बेरोजगारी बेकारी, महामारी यामुळे जनता हैराण आहे. पण सर्वच राजकीय पक्ष फक्त “आरक्षण” या मुद्याला कोळून कोळून पित आहेत. विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षाला वटणीवर आणनारा पक्ष. सरकार कोठे चुक करतय? जनहिताच्या योजना बरोबर राबवतात का? निवडणूकीतील जाहिरानाम्याचे पालन करतात का? जनतेला दिलेली अश्वाशने पूर्ण करतात का? हे पाहाणे विरोधी पक्षचे कार्य आहे व ते होत नसेल तर सरकारच्या नाकात वेसन घालून जनता दरबारात सरकारच्या चुका सांगणे अशी धारणा सामान्य लोकाची असते व आहे; पण सध्याला सरकार पक्ष कोणते व विरोधक कोणते हेच कळत नाही. दोघांचा एक कलमी कार्यक्रम म्हणजे जनता कल्याण बाजूला ठेवून फक्त एक मेकांच्या उनीवांवर फक्त बोट ठेवणे एवढेच दिसून येते.

मला वाटते विरोधी पक्ष केवळ विरोध करत आहेत व विरोध करणे हे त्यांचे कर्त्यव्य आहे. पण विरोध कशाला? आज जे सताधारी आहेत ते पूर्वी विरोधात होते व आज विरोधक आहेत ते पूर्वी सत्ताधारी होते. पण आज हे दोन्ही पक्ष आरक्षणाविषयी गळाफाडू भाषण ठोकत आहेत. बोलक्या शंका प्रमाणे यांची चढाओढ चालू आहे. मराठा आरक्षण आसो, धनगर आरक्षण आसो की ओबीसी आरक्षण. सत्ताधारी व विरोधी पक्षाला हे आरक्षण मिळूच द्यायचे नाहीत का? म्हणूनच ते एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्न करत आहेत. तू रडल्या सारखं कर मी हसल्या सारखं करतो असं त्यांच चालू आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांनी जनतेला गृहीत धरलेलं आहे.

विरोधी कोणत्याही पक्ष्याचा असो तो पक्ष दोन्हीकडून वाजवतोय हे सर्वांनाच माहित आहे. विरोधी पक्षाचं एक उदाहरण सांगता येईल. समजा नांदेडला गोदावरीला महापूर आलंय. नांदेड पाण्याखाली आहे. जनता पाण्यात वाहून जात आहे, मरत आहे, जनता मदतीसाठी टाहो फोडत आहे तर दुसरीकडे लातूर येथील जनता पिण्यासाठी पाणी नाही म्हणुन तडफडत आहे. पाण्याविना जीव जात आहे. सरकाराचे मंत्री या संकट काळात नांदेडला भेट दिली तर विरोधी पक्ष लगेच म्हणणार या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? नांदेडचे पूरग्रस्त कसेही वाहून गेले होते, मेले होते ते नांदेडला ते मंत्री जाण्यापेक्षा लातूरला जाणे महत्वाचे होते. लातूरला मदत करणे अपेक्षीत होते कारण ते पाण्याविना तडफडत आहेत. समजा सत्ताधारी लातूरला भेट दिले असते तर विरोधकांनी टिकेची झोड उठवली असती. लातूरचे लोक जीवंत होते पण नांदेडला जनता वाहूत जात आहे तिथे जाणे अपेक्षीत होते. असं असतंय विरोधी पक्ष.

संकटाचे स्वरूप पाहून जर सत्ताधारी जनतेला तातडीच्या मदतीसाठी वेळेत पोहचण्यासाठी मंत्री विमान हेलीकॉप्टरने प्रवास केले तर “जनता पाण्यात मंत्री आकाशात” अशी टिका ठरलेलीच असते. समजा मंत्रीजर रेल्वेने आले असते तर लगेच म्हणनार” यांना वेळेचे महत्व नाही. सामन्य जनतेशी, संकटाशी काही देणंघेणं नाही. आगदी आरामत प्रवास करा. म्हणजे विरोधी विरोधासाठी विरोध करत असतात.

आताचा ज्वलंत प्रश्न म्हणजे आरक्षण. त्यात मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण हे गाजत आहेत. केंद्रात सत्ताधारी आसलेल्या पक्षांचे लोक येथे विरोधात आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष वरील आरक्षण टिकविण्यात अपयशी ठरले अशी ओरड विरोधक करत आहेत. आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही व राहणार नाही. असेही ते म्हणत आहेत. पण सामन्य लोकांना प्रश्न पडलंय यांना कोण आडवलंय. खरच तुम्हाला आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर तुम्हाला कोण आडवं येतय. तुम्ही सत्ताधारी असताना काय केलात किंवा आता आरक्षण मिळावे म्हणून तुमच्या कडे कोणते नियोजन आहे हे जनते समोर मांडा. सताधाऱ्या समोर ठेवा. सभागृहात मांडा ते मान्य करून घ्या मान्य करायला भाग पाडा. महाराष्टातील तमाम सामन्य जनता कायम तुम्हाला गादीवर बसवतील. जसे विरोधक तसेच सत्ताधारीही. सरकारनेही आरक्षणाविषयी ठाम भूमिका घेताना दिसत नाही. चालू सरकार जर आरक्षण मिळवून देण्यात यशस्वी ठरले तर विरोधक येथून कदाचीत शुन्यावरच आऊट होतील. पण या दोघांनाही हे काम कोणाचे आहे. तेच ते ठरवत नाही. कोर्टाने आरक्षण नाकरल्या नंतर आरक्षणाचा चेंडू कोणाच्या कोर्टात जाते हे सर्व यांना माहित आहे. तरी येथील विरोधी पक्ष संप मोर्चा काढून सामान्य जनतेची दिशाभूल करत आहे. जनतेच्या भावना भडकवण्यासाठी राजकारण करत आहेत.

येथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय गंमत बघा. एका गावात एक माळी राहत होता. त्याने एक सुंदर बाग तयार केली होती. त्यात वेगवेगळी फुलझाडे लावली, फळझाडे लावली होती. एकेदिवशी त्या सुंदर बागेत एक गाय शिरली व बरीच नासधुस केली त्या बागेमध्ये. माळीला राग आला. त्याने रागात गाईला धोंडा हिबाळून मारलं. धोंडा वरमी बसला व गाय मेली. तो माळी धार्मिक वृतीचा होता. पापभिरु होता. पण चालाख होता. तो पापाच्या भितीने सांगत सुटला गाईला मी मारलो नाही. हे हात इंद्र देवाने दिले आहेत. या हाताने गाय मारली म्हणून गाय मारल्याचं पाप मला लागणार नाही हे पाप इंद्राचे आहे.

ही वार्ता इंद्र दरबारात पोहचली. इंद्र देव तात्काळ त्या माळ्याच्या घरी वेषांतर करून पोहचले. त्याचाशी छान गप्पा गोष्टी झाल्या. संध्याकाळचं जेवन करून माळी व तो पाहुना बागेत फिरत होते. त्या पाहुण्याने बागेची खूप तारिफ केली व माळ्याला विचारले ही बाग कोणी तयार केली? माळी त्या पाहुण्याच्या तरीफीने लईच हुरळून गेला होता. आता तो माळी जोरजोरात सांगू लागला ही बाग मी बनवली स्वतः बनवली. पाहुण्याने विचारले ही बाग तुमच्या हाताने तयार केली. त्यावर तो बढाई मारत म्हणाला, “हो हो ही बाग माझ्या हाताने तयार केली. हातवारे करत म्हणाला” या हाताने तयार केली या हाताने.”यावर इंद्र म्हणाला,” बाबा या तुझ्या हाताने तयार केली?” “होय या माझ्या हाताने तयार केली. हया माझ्या मजबूत हाताने तयार केली.”

मग गाय तुझ्या या हातनेच मारलास ना. मग हे हात इंद्राचे कसे. पाप तू केलंस ना मग इंद्राला दोष का देतोस? चांगलं तेवढे तूझं व वाईट केलं ते दुसऱ्याचं कसं?आता राजकारणी असेच करत आहे. जे चांगलं झालं ते आम्ही केलं व वाईट झालं ते आमच्या आगोदरच्यानी केलं. ते त्याच पाप आहे. सत्ताधारी व विरोधक या आरक्षण प्रश्नात पापाचे समान भागीदार आहेत पण ते एकमेकांवर चालढकल आहेत. आरोप प्रत्यारोप करत आहेत. या राजकीय लोकांना वाटते सामान्य माणसाला काहीच कळत नाही. यांना आपण नेहमीच “मामा” बनवू. पण जमाना बदलत आहे . सामन्य जनताही राजकारण व राजकारणी यांना आता चांगली ओळखत आहे. लबाडांच्या अवतानाने पोट भरत नाही हे सामन्य जनतेला आता कळून चकूलय. सामान्याची पोरं ही आता शहणी नाहीत पण हुशार होत आहेत.

महागाईने कळस गाठला आहे. या विषयी खरं तर केंद्रशासनाला येथील सर्व पक्षीय लोकांनी सांगायला पाहिजे. चर्चा करायला पाहिजे. त्या विषयी कोणी मोर्चा काढत नाही. चक्कार शब्द बोलत नाही. पण जे यांना करता येत नाही. यांच्या हातात नाही त्या विषयी मात्र मोर्चा निघत आहेत. महागाईने सामन्य जनता भरडली जातेय. ज्या पक्षाचं सरकार केंद्रात आहे ते पक्षवाले किमान महागाई विषयी तरी जनतेकडून बोलावे. मोर्चा कढावे अशी सामान्य जनतेची कोरोनाच्या काळात मुक मागणी आहे. या कडे फारसं गांभीर्याने कोणताही पक्ष लक्ष देताना दिसत नाही; पण जे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या हातातच नाही त्यांना त्यात फारसं काही करता येत नाही त्या बाबीचा त्यांनी फुटबॉल करून जनतेसमोर टोलवाटोलवी चालू आहे. पण ये पब्लीक है सब जाणती है ! हे कोणीही विसरू नये.

सताधारी व विरोधी पक्षांनी काही काळाकरिता का होईना चांगल्या गोष्टीसाठी एकत्र येवून मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण आसो वा ओबीसी आरक्षण घटनेच्या चौकटीत बसवून केंद्र शासनास कायदा करण्यास भाग पाडावे ही सामन्य जनतेची इच्छा आहे. पुढे तुम्हाला जनता दरबार जावयाचे आहे जनेताला तुमच्या दरबारात नाही.

राठोड मोतीराम रुपसिंग
“गोमती सावली” काळेश्वरनगर, विपणुपूरी, नांदेड-६.
९९२२६५२४०७ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *