खादी प्रेमीनी खादीची खरेदी मोठ्या प्रमाणात करावी – खादी समितीचे सचिव तथा माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांचे आवाहन…!

मराठवाडा खादी समितीच्या कंधार येथील नवीन खादी शोरूमचे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या हस्ते शुभारंभ

कंधार ; प्रतिनिधी

 कंधार येथे मराठवाडा खादी ग्रामउद्योगाचे नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य शोरुमचा शुभारंभ आज दि.६ जुलै रोजी खादी समितीचे सचिव तथा माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

खादी प्रेमीनी खादीची खरेदी मोठ्या प्रमाणात करावी असे आवाहन खादी समितीचे सचिव तथा माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी केले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, माजी नगराध्यक्ष रामराव पवार, माजी जि.प. सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर, बबर मोहम्मद आदी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खादी समितीचे सचिव माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी नागरिकांना असे आवाहन केले की,खादी प्रेमीनी मोठ्या प्रमाणात खादीचा वापर करावे तसेच सर्वच

कर्मचाऱ्यांनी देशभक्ती म्हणून खादी चा वापर करणे काळाची गरज असून मोठ्या प्रमाणात खरेदी करता यावी म्हणून कंधार येथे खादी समिती कडून दहा टक्के सुट देण्यात आली असल्याने खादी प्रेमीनी खादीचे लृकापड व वस्तू विकत घेण्याचे आवाहन माजी आमदार तथा खादी समितीचे सचिव ईश्वरराव भोसीकर यांनी केले.

दरम्यान खादी समितीचे सचिव माजी आमदार ईश्वरराव भोसीकर , जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर,माजी नगराध्यक्ष रामराव पवार,सौ.वर्षाताई भोसीकर,बब्बर महंमद ,बालाजीराव चुकलवाड, हमीदोद्दीन मोलीसाब,अशोकराव आंबेकर, रमेशसिंह ठाकूर,महेश भोसीकर, हमीदभाई सुलेमान, राजकुमार केकाटे ,हनुमंतराव पाटील पेटकर,यांचा सत्कार करण्यात आला. रविंद्र मठपती,व्यवस्थापक प्रफुल्ल भागानगरे, शिवराम कीडे,हरीभाऊ नाईकवाडे,अरुण भोसीकर आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *