सध्या देशात वंशपरंपरागत राजकिय वारसा ही पध्दत रुढ झालेली दिसते आहे.जो-तो आपल्या पिढीदर पिढीत राजेशाही सारखे वंशपरंपरा चालू राहावी. असे प्रत्येक राजकिय महत्वकांक्षी लोकांच्या मनात स्वार्थांध वृत्ती दडलेली असते.याला छेद देत कंधार तालूक्यातील कंधार शहराच्या ईशान्य दिशेला डोंगर-दर्यांत वसलेल्या नंदनवन नगरीत एका शेतकरी कुटूंबात पहिलवान उत्तमराव पाटील हूंबाड यांच्या उदरी जन्मलेला सुपुत्र योगेश!
योगेश याचे प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.हायस्कूलचे शिक्षण श्री शिवाजी विद्यालय बारुळ येथे पार पडत असतांना त्याची जिज्ञासूवृत्ती मला पहाता आली.तो सातवी/आठवीत असतांना त्यास डाॅ.भाई केशवराव धोंडगे व भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या कार्याची आवड निर्माण झाली.पण त्यास वाटत होते कंधार सारख्या दुर्गम डोंगर-दर्यांत जे कार्य मग ते राजकिय,शैक्षणिक, सामाजिक, चळवळीच्या माध्यमातून केले त्यांची वाटचाल जाणुन घेण्याची लालसा योगेश मनात निर्माण झाली.त्या वेळी माझी शाळा ही श्री शिवाजी विद्यालय बारुळ होती.दुपारी डबा खाऊन झाल्यावर मैदानावर दुपारची शाळा भरे पर्यंत माझ्या कडे प्रश्नांचा भडिमार करुन डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब व भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांच्या कार्याची माहिती मिळवून घेणे हाच त्याचा दैनंदिन हुद्दा,त्याच्याकडे वक्तृत्व कलेचे गुण असल्या कारणाने तो विचापिठ गाजवून सोडायचा अनेक वक्तृत्व स्पर्धेत भाग घेवून खुप बक्षीसे कमविली.
तो वर्ग आठवीत असतांना राजकिय प्रचारपिठे गाजवायचा माझ्या तालमीत तो घडत गेला.आज पाहता-पाहता.शे.का.पक्षाचा जिल्हाध्यक्ष व आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांचा सोशल मिडिया प्रमुख व समर्थ म्हणून आपला राजकिय प्रवास करत आहे.या आधी शिवसेनेचे
माजी आमदार रोहिदासराव चव्हाण साहेब यांचे कट्टर समर्थक व युवा नेते नवनाथराव चव्हाण साहेब यांचे मित्र म्हणून नावारूपास आला.
नंदनवन ग्रामपंचायत निवडणुकीत फाॅर्म भरतांना शक्तिप्रदर्शन आजही तालुक्यात नव्हे जिल्हाभर गाजले.समाजात अन्याय होताच त्यावर तुटून पडून न्याय मिळवून घेण्यात त्याचा हातखंडा आहे.आजच्या वाढदिवसानिमित्त युवा नेतृत्व योगेश पा.नंदनवनकर यास वाढदिवसानिमित्त दीर्घायुरारोग्य अभिष्टचिंतन!
दत्तात्रय एमेकर ,
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार