डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांनी विधानसभेत दाखवलेल्या मन्याड थडीच्या यजस्वी वाणीची स्वाभिमानी मर्दुमकी

कंधार ; दत्तात्रय एमेकर

मन्याड खोर्‍यातील कंधार म्हटले की अख्या महाराष्ट्राच्या ओठावर डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांचे नाव स्वाभिमानाने घेतल्या जाते.त्यांनी केलेली विधानसभेतील मर्दुमकी कंधारचा बाणेदार पणा सिध्द करते.त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत १९५७,१९६२,१९६७,१९७२,१९८५,१९९० या पाच टर्ममध्ये जी कामगीरी बजावली. जवळपास अडीच तप त्यांची ओजस्वी वाणी विधानसभेत गाजली.

त्या कामगीरीचे जवळपास १२{ एक तप संख्येचे) खंड संत योगिराज निवृत्ती महाराज यांची पावनभुमी श्रीक्षेत्र पेंडू नगरीत प्रकाशन सोहळा पार पडला.बारा खंड जवळपास २०००/ २५०० पेज एका खंडात आहे.त्या खंडात भाषणांचे शब्दरुप आहे.

आज दि.१३ जुलै रोजी छ.शंभूराजे इंग्लिश मीडियम स्कूल वीर नागोजी नाईक चौक कंधार या ज्ञानालयात बैठक पार पडला.या १२ खंडातून स्थगन प्रस्ताव, तांराकीत प्रश्न, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आयत्यावेळचे विषय, प्रचंड हशा,साहित्य कोट्या,चिमटे अशा अनेक माध्यमातून विधीसभेत आवाज उठवला.

आमदार असावा कसा?याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे हे व्यक्तीमत्व होय.पण महाराष्ट्राला या युवा पिढीला जागरुक आमदारांचे दर्शन होईल. विद्रोही विचारवंत डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या शतकमहोत्सवी वाढदिवसास जणुकांही आरंभच झाला.

या प्रसंगी डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांनी आचार्य अत्रे प्रकरणावर आपल्या भावना व्यक्त करुन डाॅ.प्रा. पुरुषोत्तम भाऊ यांचे कौतुक करतांना गौरवोद्गार काढले.खंदारी वात्रटिका / कंधारी आग्याबोंड या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा मनोदय डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तम भाऊ यांनी व्यक्त केला.

या १२ खंडाच्या वर्गीकरणा मुळे भविष्यातील व वर्तमानातील अनेक आमदार महोदयांना मार्गदर्शक म्हणून नक्कीच लाभेल.अशी आशा नव्हे विश्वास वाटतो.
विधानसभेतील अनिल घारुळे यांनी आणलेल्या बारा खंडांचे वाटप संस्थेचे अध्यक्ष व युवानेते डाॅ.प्रा.पुरुषोत्तम भाऊ धोंडगे साहेब यांच्या समर्थ हस्ते वर्गीकरण करण्यासाठी खालील मान्यवरांना वाटप केले.आमचे उर्जास्त्रोत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब जातीने उपस्थित होते.

खंड वाटप झालेली यादी

१) व्ही.जी.चव्हाण सर
२)डाॅ.गंगाधरराव तोगरे सर
३)माधवराव पेठकर सर
४) प्रा.महेश मोरे सर
५) प्रा.डाॅ.सावंत सर
६) प्रा.पुजार सर
७)एस.एम.सोनटक्के सर
८) दत्तात्रय एमेकर सर
९) मारोतीराव सूर्यवंशी सर
१०) प्रा.जयराम सूर्यवंशी सर
११)प्रा.शिवराज पवळे सर
१२) प्रा.नानासाहेब सूर्यवंशी सर

यांच्याकडे या ग्रथांचे वर्गीकरण करण्याची जबाबदारी स्वइच्छेने वरील सर्वांनी स्विकारली. डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तम भाऊ थोंडगे यांनी सर्वाचे मनस्वी आभार मानून मानाची कोटी-कोटी जयक्रांति केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *