मानवी जीव जेव्हा जेव्हा निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करतो . स्वतःला निसर्गापेक्षा मी वर चढ आहे ही भावना त्याच्यात निर्माण होते तेव्हा निसर्ग स्वतःचे खरे रूप प्रगट करतो. आणि निसर्गाच्या रौद्ररूपा पुढे मानव हा हतबल होतो . .कोरोनाने जातपात , देश, धर्म सर्व विसरायला लावले आहे . गरीब श्रीमंत हा भेदभाव कोरोनामुळे जगाने विसरले आहे . या रोगाने सर्व देशांच्या सिमा मिटवल्या आहेत . सर्व जग एक घर म्हणून या रोगाशी लढा देत आहे . चीन सारख्या मुजोर देशाने स्वतःच्याच मस्तीत जगणारं , पोलादी पडदा असलेलं स्वतःच्या देशात काय चाललंय हे बाहेरच्या जगाला न कळू देणारं चीन . स्वतःला महाशक्ति समजणारं हे राष्ट्र जेव्हा हतबल होते तेव्हा निसर्गाचं बल शक्ती सगळ्यांचा लक्षात येते. हा देश खराच हतबल झालं की हातबल झाल्याचं नाटक करतोय हे अजून समजायचे आहे . जगातील बहुसंख्य देशाचं मत आहे हे कट कारस्थान चीनचे आहे . तो येडगावचं सोंग घेवून पेडगावला जात आहे .
जेव्हा जीवावर बेतते तेव्हाच हालचाल करण्याची तऱ्हा मानवाने हस्तगत केली आहे . आपल्याकडे एक म्हण आहे . “तहान लागल्यावर विहिर खोदणे” असाच काहीसा प्रकार सध्याला चालू आहे . ग्रामिण जनतेकडे स्वच्छतेची साधने नसतील पण ते पुराण काळापासून बाहेरुन येणाऱ्या माणसांना हातपाय धुतल्या शिवाय घरात येवू देत नसत . पण अधुनिकतेच्या नावा खाली स्वच्छता समजातूनच गायब झाली आहे . प्रत्येकजण मी स्वच्छ आहे मला परिसर स्वच्छतेची गरज नाही . ते काम माझे नाही . ते काम सरकारच आहे सरकार करेल . अशीच काहीसी भावना प्रत्येकांची झालेली आहे .
प्रवासाच्या वेळी एसटी बस आसो की रेल्वे प्रत्येकजण बेफिकीरीने वागतो . सगळीकडे घाण करतो . कोणी एका सज्जनाने असं करणं योग्य नाही म्हणलं तर “लगेच तुझ्या बापाची गाडी आहे का ? सरकारची गाडी आहे . मी काहीही करेण असे उत्तर ठरलेले असते . गावातील , शहरातील मोकळी जागा रिकामं प्लॉट म्हणजे अस्वच्छतेच माहेर घर . खरंतर या जागा स्वच्छ ठेवायला पाहिजे . शेजारचा स्वच्छ राहीला पाहिजे मला कोणी शिकवायचं नाही ही आपली वृती आहे .”
असे जिथं बोलल जाते . तेथे चांगल्या सवयची अपेक्षा करणं चुकीचं आहे , नाही का ? जो पर्यंत प्रत्येक जण स्वच्छता पाळणार नाही आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणार नाही तोपर्यंत कोरोनाच काय कोरोनाचे नातू पणतू ही येथेच मुक्कामाला येतील . ते स्वच्छतेचे काम आपण सगळ्यांनी मिळून केले पाहिजे .
जेव्हा जेव्हा निसर्गानं मानवाला धडा शिकविला तेवढया पुरतचं तो शाहणा झाला आहे असं दिसून येते . जोपर्यत माणुस स्वतःहोवून स्वतःवर काही बंधने लादून घेणार नाही . स्वच्छतेचे महत्व जाणून घेणार नाही, तोपर्यंत सर्वजण हे काम शासनाचं आहे असचं म्हणत राहणार आहेत . लोक हो चला जागे व्हा . कोणी सांगतात म्हणून स्वच्छता पाळू नका . स्वतः होवून जागे व्हा . प्रथम करा व मगच दुसऱ्यांना सांगा . सार्वजनिक ठिकाण हे आपलं ठिकाण आहे . ते शासनाचं नाही . शासन म्हणजे कोण ? हे समजून घ्या . शासन काही आकाशातून खाली आलेले नाही . शासन म्हणजे आपण सर्व आहोत . प्रत्येकजण म्हणत असतात मंत्र्याची गाडी माझ्या घरासमोरुन जावू द्या . का ? तर घरासमोरील आगंण रस्ता कोणीतरी साफ करतो म्हणून . आशी आपली वृती झालेली आहे .
चला तर मग आपण स्वतः स्वच्छ राहू .परिसर स्वच्छ ठेवू . करोना सारख्या घातक रोगाला पळवून लावू . कोरोना आता वेगवेगळी रूपं धारण करतो आहे . एकावर मात दुसरं रूप तयार . कोणे एके काळचा हा राक्षस आहे . हा राक्षस कोणत्या रुपात भेटेल , कधी भेटेल हे सांगता येत नाही . याला वेळ काळ नाही . लक्षात ठेवा आपण काही प्रत्यक्ष परमेश्वर नाहीत . आपणास काहीच होणार नाही . आपण खुप तगडे आहोत . मजबूत आहोत असे समजू नका . या राक्षसाठी जे नियम शासनाने , आरोग्य विभागाने घालून दिलेले आहेत ते सर्वजण पाळू या . विनाकारण फिरून शासनाची समाजाची शेजाऱ्याची डोकेदुखी ठरू नका .कोणताही रोग गरिब श्रीमंत पाहात नाही तो सगळ्यांना एकाच तराजूत तोलतो . म्हणून आपण सर्वजन कोरोनाचे नियम पाळू या .
या राक्षसाने गोरगरीब दीन दलीताच्या संसाराची राख रांगोळी केलेली आहे . कितेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत . हाजारो तरुणाला बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे . या गोष्टीचा आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करावायस पाहिजे .
कोणतीही आलेली आपत्ती ही चांगल्या साठीच येते , धडा देण्यासाठीच येते आपल्याला जीवनाचं पाठ समजावून सांगते असं समजू या . कोरोनाने मानव प्रगतीचे गर्वहरण केलेले आहे . प्रगतीच्या पोकळ कल्पना आपण किती करतो हेही सिद्ध झालेले आहे . मानव निसर्गावर कितीही विजय मिळवण्याचा प्रयत्न केला तरी निसर्गापुढे मानवाची प्रगती ठेंगूच ठरते . चिल्लर ठरते . हे आतातरी आपल्या सर्वांच्या लक्षात आले पाहिजे . रोगापासून दूर रहा पण रोग्याला भावनिक साथ द्या . शरिराने आतंर ठेवा . मनाने भावानेने दूर जावू नका . भावनिक आतंर वाढू देवू नका . जवळ रहा . चाला सर्व मिळून कोरोनाशी लढू या . कदाचीत तिसरी लाठ आलीच तर ते थोपवण्यासाठी बाहेरून कोणी येणार नाही . आपल्यलाचं तोंड द्यावे लागणार आहे . लढावे लागणार आहे .
कोरणामुळे संसाराची गाडी कोरोणाच्या चिखलात रुतली आहे . ते आपणास स्वतःलाच बाहेर काढावयाचे आहे . रडायचं नाही . कुतायच नाही .आता घाबरायचं नाही . कोराणाशी लढा द्यायचं आहे . कोरोनाला हरवायचं आहे . आपण स्वतः सुरक्षित राहून आपलं कुटुम्ब सुरक्षित ठेवायचं आहे . शेजाऱलाही जपायचं आहे .
राठोड मोतीराम रुपसिंग
” गोमती सावली ” काळेश्वर नगर
विष्णुपूरी, नांदेड .
९९२२६५२४०७ .