कंधार दिनांक 14 जुलै ( प्रतिनिधी)
देशाचे माजी गृहमंत्री आधुनिक भगीरथ स्व. डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी भोसीकर दांपत्य सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरा करत असतात याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त फुलवळ तालुका कंधार येथील उपकेंद्रावर लस घेणाऱ्या नागरिकांना जिल्हा काँग्रेस कमिटी कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर व सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांच्या वतीने मास्क, मिनरल वॉटर, बिस्किट, उप केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सेनेटाइजर चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार भोसीकर दाम्पत्याच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच प्रतिनधि नागनाथ मंगनाळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुस्ताक शेख, मुख्याध्यापक बसवेश्वर मंगनाळे, गंगाधर शेळगावे,महेश मंगनाळे, प्रवीण मंगनाळे, श्रीकांत मंगनाळे,संदीप मंगनाळे,पत्रकार विश्वम्बर बसवन्ते, आरोग्य केंद्रातील एस. एम. अल्ली, सुधाकर मोरे, सौ. जयश्री गुंडे, मोहन पांचाळ,प्रकाश गोदने, माणिक मंगनाळे,सौ. लतिका मुसले, सौ. मीणा वाघमारे, रुकियाबी शेख आदि सह गावातील नागरिक यांची उपस्थिती होती.
यावेळी कोरोणा प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्या नागरिकांना मास्क मिनरलवॉटर,बिस्किट व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना सनेटायज़र चे वाटप संजय भोसीकर व सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना संजय भोसीकर म्हणाले की डॉ शंकराव चव्हाण हे आधुनिक भगीरथ होते त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये मराठवाड्यामध्ये जायकवाडी विष्णुपुरी सारखे महत्वकांशी जलसिंचनाचे प्रकल्प राबवले अत्यंत शिस्तप्रिय असलेले नेते आणि कुशल प्रशासक नेते म्हणून त्यांची ख्याती होती.
याप्रसंगी बोलताना सौ. वर्षाताई यांनी कै. शंकरराव चव्हाण यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून गावातील नागरिकांना असे आवाहन केले की कोरोना हा संपला नसून दुसरी लाट ओसरली असे वाटत असले तरी आपण आता आपण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत यासाठी या विषाणु पासून आपला व आपल्या कुटुंबाचा बचाव करायचा असेल तर गावातील नागरिकांनी विशेष करून महिलांनी आपले व आपल्या कुटुंबियांचे लसीकरण करून घ्यावे लस अत्यंत सुरक्षित असून या लसीमुळे कुठला अपाय नाही यातून कोरोना विषाणूशी लढन्यासआपल्याला सक्षम बनवणार आहे त्याचबरोबर शासनाच्या नियमाचे वारंवार हात धुणे मास्क वापरणे सामाजिक आंतर बाळगणे आदी शासनाचे नियमाचे पालन करून आपला व आपल्या कुटुंबियांना बचाव करावा असे सौ.वर्षाताई म्हणाल्या फुलवळ आरोग्य केंद्र अंतर्गत अत्यंत चांगल्या प्रकारचे काम चालत असून येथील कर्मचारी डॉक्टर अहोरात्र पणे परिश्रम करत आहेत त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार सौ.वर्षाताई यांनी मानले.