कंधार (प्रतिनिधी) सलग दोन दिवसापासून लोहा-कंधार मतदार संघात पावसाने थैमान घातले असून लोहा-कंधार मतदार संघातील हजारो हेक्टर शेतीचे अतोनात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिनांक 14 जुलै रोजी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी कंधार तालुक्यातील पानशेवडी, गणातांडा,कंधारेरवाडी येथील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या यावेळी कंधार चे नायब तहसीलदार विजय चव्हाण प्रमुख उपस्थिती होती.
या ना त्या कारणाने मतदारसंघातील शेतकरी राजा नैसर्गिक संकटात वेळोवेळी सापडत असल्याने आशाताई शिंदे यांनी दुःख व्यक्त करत लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे हे सदैव शेतकरी कष्टकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही उपस्थित अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांशी बोलताना आशाताई शिंदे यांनी दिली यावेळी आशाताई यांनी पानशेवडी गावात जाणारा ब्रिज सेन्ट्रीग वाहून गेल्याने तेथील पाहणी करून संबधित गुत्तेदारला योग्य पध्दतीने काम झाले नाही तर कार्यवाही करण्यात येईल अशा सूचनाही करण्यात आल्या तसेच पानशेवडी गावातील आशाताई शिंदे यांनी पुलाची पाहणी करून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पर्याय रस्ता तयार करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी तहसीलदार विजय चव्हाण यांना दिल्या व आमदार शामसुंदर शिंदे हे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या सदैव सोबत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना स्पष्ट केले यावेळी जळबा पाटील मोरे, प्रल्हाद पाटील मोरे ,माधव घोरबांड ,कोंडीबा मोरे,बंटी गादेकर ,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेरू भाई, शिवाजी मोरे, दत्ताजी शिंदे,कंधारेरवाडी सरपंच कंधारे सह शेतकरी बांधव उपस्थित होते.
गणा तांडा तालुका कंधार येथे दिनेश केशव पवार यांचे वीज पडून अपघाती निधन झाल्याने पवार कुटुंबियांचे सात्वन सांत्वन सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शामसुंदर शिंदे यांनी केले यावेळी नायब तहसीलदार विजय चव्हाण यांनी पवार परिवाराचे सांत्वन केले व लवकरात लवकर पवार कुटुंबियांना जास्तीत जास्त आर्थिक मदत आर्थिक मदत मिळवून देऊ असे सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी पवार कुटुंबियांशी बोलताना स्पष्ट केले ,यावेळी पानशेवडी येथील संतोष जगताप यांना बऱ्याच दिवसांपूर्वी वीज पडून दुखापत झाली होती त्यांच्या घरीही सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी भेट देऊन जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई शिंदे यांनी केली व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.