कंधार (दि. 14 प्रतिनिधी ) पंचायत समिती परिसरात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात यावा असा ठराव. दि.13 जुलै रोजी झालेल्या पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.हा ठराव पं. स. सदस्य उत्तम चव्हाण यांनी मांडला तर ठरावास अनुमोदन पं. स. सदस्य सुधाकर सूर्यवंशी यांनी दिले.
महाराष्ट्र राज्याचे मा मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या साडे अकरा वर्षांच्या कारकीर्दीत कृषी, शिक्षण, औद्योगिक, सिंचन, शहरीकरण यासह अनेक क्षेत्रात मोठ-मोठे प्रकल्प उभे औद्योनिक महाराष्ट्र घडवला त्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह गोरगरिब जनतेला प्रेरणा मिळत आलेली आहे. येणाऱ्या भावी पिढीस त्यांच्या कार्यापासून नवयुकांना चालना मिळावी यासाठी कंधार पंचायत समितीच्या परिसरात वसंतराव नाईक यांचे स्मारक उभा करण्यात यावा असा ठराव कंधार पंचायत समितीच्या सर्व साधारण सभेत पं स सदस्य उत्तम चव्हाण यांनी मांडले.
… या ठरावावर इतर सदस्यांनी मत मांडून एकमताने ठरावास मंजूरी देण्यात आली..
.
या सर्व साधारण सभेच्या बैठकीस पंचायत समिती सभापती लक्ष्मीबाई घोरबांड, प स सदस्य भिमराव जायभाये, प स सदस्य दिगंबर वडजे, प स सदस्य सुधाकर सुर्यवंशी, प स रेखाताई धुळगुंडे, प्रभारी सचिव, कृषीधिकारी शिवराम मुंढे यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.