नांदेड ; प्रतिनिधी
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड तथा परभणी जिल्हा चे निवासी उपजिल्हाधिकारी श्री महेश वडदकर यांची आज दि.१४ जुलै रोजी भेट घेऊन सैनिकांच्या अनेक समस्यांनवर चर्चा करण्यात आली.
माजी सैनिक हे भारतीय सरहद्दीवर आपल्या प्राणाची बाजी लावून सेवा बजावत देश सेवा करतात.तसेच सेवा निवृत झाल्यावर देशील आपली देशसेवेची भावना सहकुटूंब जपत असतात.माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांना शासनाच्या सर्व योजना मिळाव्यात यासाठी माजी सैनिक संघटनेच्या वतीने सतत प्रयत्न केले जातात.
माजी सैनिकांचे अनेक प्रश्न नांदेड जिल्हात प्रलंबित असून ते तात्काळ मार्गी लागावे म्हणून माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड तथा परभणी जिल्हा चे निवासी उपजिल्हाधिकारी श्री महेश वडदकर यांची आज दि.१४ जुलै रोजी भेट घेऊन सैनिकांच्या अनेक समस्यांनवर चर्चा करण्यात आसल्याची माहीती जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली आहे.यावेळी माजी सैनिक संघटना कंधार तालुका अध्यक्ष कांबळे ,कोषाध्यक्ष पोचिराम वाघमारे आदीसह माजी सैनिकांची उपस्थिती हौती.