कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील फुलवळ व परिसरात सततच्या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.या झालेल्या नुकसानीची पहाणी व पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी ग्रामपंचायत फुलवळच्या वतीने ठराव घेऊन अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत कार्यालय फुलवळच्या सरपंच विमलबाई नागनाथ मंगनाळे यांचे प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे व माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी दि.१३ जुलै रोजी तहसिलदार कंधार यांना ग्रामपंचायतीच्या ठरावपत्र दिले.
या दिलेल्या लेखी निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कंधार तालुक्यात दि.१० जुलै २०२१ रोजी झालेल्या ढगफुटी दृश्यअतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे फुलवळ व परिसरातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिके वाहून गेले आहेत,व तसेच ग्रामपंचायतीचे सार्वत्रीक पाणीपुरवठ्याच्या मोटारी व स्टाटर वाहून गेलेले असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात नाल्याचे पाणी शेतामध्ये जाऊन शेतातील लहान पिके व माती खरडून गेली असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.फुलवळ व परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेताची पाहणी करून पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर सरपंच विमलबाई नागनाथ मंगनाळे, उपसरपंच तुळसिदास बसवंते माजी सरपंच बालाजी भुजंगराव देवकांबळे यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य अदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.