शेख युसूफ व स्वाती मुंडे या शिक्षकांच्या मेहनतीने बदलले शाळेचे रुपडे
कंधार ; प्रतिनिधी
सद्याच्या कोरोना महामारित शाळा बंद असल्या तरीही आनलाईन शिक्षणाचे धडे माञ चालु आहेत.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवरंगपुरा एक्सप्रेस चा आनलाईन उपक्रम सद्या जोरात चालू आहे.शेख युसूफ व स्वाती मुंडे या उपक्रमशिल शिक्षकांच्या मेहनतीने शाळेचे चक्क रुपडेच बदलले आहे.
कंधार शहराच्या जवळ असलेला व ऐतिहासिक जगतुंग समुद्राच्या सानिध्यात वसलेला तथा ऐतिहासिक किल्याच्या जवळ असलेला नवरंगपुरा हे गाव या गावात जिल्हा परिषद ची पाचवी पर्यत शाळा असुन सद्याच्या कोविड काळात शाळा बंद असल्यामुळे शाळा बंद परंतु शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत येथील शिक्षक युसूफ शेख व सहशिक्षिका स्वाती मुंडे यांच्या संकल्पनेतुन माझा अभ्यास घरचा अभ्यास..तथा सेतू अभ्यासक्रम या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन आनलाईन तथा आँफलाईन अभ्यास देऊन गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सामाजिक कार्य कर्त्या आशाताई शिंदे यांच्या मार्फत वृक्षारोपण करण्यात आले..नवरंगपुरा गुणवत्ता एक्सप्रेस ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी धावेल असेही शेख युसूफ व स्वाती मुंडे यांनी म्हटले आहे..या प्रसंगी बहाद्दरपुरा संकुलाचे केंद्रप्रमुख मेहरबान पवार ,केंद्रीय मुख्याध्यापक सुनिल गवळे यांनीही नवरंगपुरा गुणवत्ता एक्सप्रेसला शुभेच्छा दिल्या.