दहावी मध्ये घवघवीत यश मिळाल्या बद्दल मोहम्मद अदिब रफिक चा विविध स्तरातून सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

मोहम्मद अदिब रफिक हा श्री शिवाजी हायस्कूल कंधार चा विद्यार्थी असून त्याने वर्ग दहावी मध्ये 95.40% गुण घेऊन घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्याबद्दल डॉ.जाधव हॉस्पिटल च्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

मोहम्मद अदिब चे प्राथमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कंधार येथे झाले. तत्कालीन संचालक डॉ. भगवान जाधव यांच्या हस्ते अदिबचा पाचवी ते सातवी पर्यंत विविध परीक्षेत यश मिळाल्याबद्दल नेहमीच सत्कार झाला आहे. अदिबने इयत्ता दहावी मध्येही यशाची परंपरा चालू ठेवल्यामुळे डॉ.भगवान जाधव डॉ.अर्चना जाधव, मारुती जाधव यांच्या वतीने निवासस्थानी बोलवून सत्कार पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

तसेच इंग्रजी विषयात 96 गुण घेतल्याबद्दल इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक नारायण जाधव (बाबा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष न. प. तथा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मोहम्मद हमीद सुलेमान, बारी सौदागर, यांनीही
अदिबचा यशाबद्दल सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कैलास बुक सेंटर चे मालक दत्तात्रेय मामडे व कैलास मामडे, यांच्यावतीने दैनिक पुढारीचे श्री राजेश भोळे यांच्या हस्ते अदिबचा सत्कार केला.

आदिबचे वडील मोहम्मद रफिक सतार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, न.प. कंधार येथे सहाय्यक ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत म्हणून ग्रंथालयातील कर्मचारी महाराज मिलिंद, लता ढवळे, किशन भालेराव, जवादवाड राधाबाई, रंजीत भालेराव, बालाजी जवादवाड या कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्वातर्फे सत्कार करण्यात आला. वरील सर्व ठिकाणी आदिबचे काका मोहम्मद आयुब सत्तार, वडील मोहम्मद रफीक, भाऊ मोहम्मद जुबेर आदीची उपस्थिती होती. मोहम्मद रफीक सत्तार,यांनी सत्कार करून मुलाचे मनोधर्य वाढवल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *