कंधार – प्रतिनिधी
कंधार / लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्यपत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि.२० जुलै रोजी कंधार / लोहा मतदारसंघातील मतदार व विविध संघटनेतील पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या कडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सप्ताह आयोजित केला होता. दि. २० जुलै रोजी कंधार / लोहा मतदारसंघातील सर्व गावामध्ये सामूहिक वृक्षारोपण कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यालाही मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्याकडून उदंड प्रतिसाद आला. कंधार येथील रुग्णालयात अजीमभाई, शेरूभाई, मकदुमभाई यांच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच पेनूर येथे मारोती एजगे याच्या वतीने फळे वाटप करण्यात आले. हाळदा येथे सॅनिटायझर, मास्क वाटप करण्यात आले तर कंधार/ लोहा मतदारसंघात अनेक गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या नांदेड येथील निवासस्थानी विविध पक्षांचे नेते, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांनी भेटून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पा. शिंदे, जि.प. सदस्य चंद्रसेन पाटील, कंधार तहसीलदार व्यंकटेश मुंडे, लोहा तहसीलदार विठ्ठल परळकर, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, कंधार नायब तहसीलदार विजय चव्हाण, लोहा खरेदी विक्री संघ सभापती प्रा. संदीप पा. उमरेकर, कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर चोंडे, लोहा खरेदी विक्री संघ उपसभापती श्यामअण्णा पवार, गटविकास अधिकारी जोंधळे, नांदेड मनपा सभापती संगीताताई डक, स्वाभिमानी संभाजी बिग्रेड माधवराव देवसरकर, सोनखेड पोलीस उपनिरीक्षक देवकते, सुशिलाताई पानपट्टेसह पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या .तसेच दूरध्वनीवरून आ. मोहनअण्णा हंबर्डे, आ. राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे
कंधार नगरपालीकेच्या नगराध्यक्षा सौ.शोभाताई अरविंदराव नळगे यांचे प्रतिनिधी शहाजी नळगे ,मन्नान चौधरी,हमीद सुलेमान ,शेख हब्बु भाई,अझीमोद्दीन,उत्तम चव्हाण,माजी सरपंच बालाजी देवकांबळे,सत्यनारायण मानसपुरे,सतिश देवकत्ते ,शेख शेरुआदीसह कंधार तालुक्यातील विविध संघटनेचे पदाधीकारी
यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सौ. शिंदे यांच्या निवासस्थानी दिवसभर कार्यकर्ते, हितचिंतकाची शुभेच्छा देण्यासाठी रीघ होती. अनेकांनी भेट देऊन तर अनेकांनी मोबाईलवरून उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.