महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात देशातील पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून मान्यता पावले आहेत. त्या सर्वेक्षणानुसार असं समोर आलं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सर्वेक्षणात जवळपास 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंना मतदान करणार असल्याचं काही मतदारांनी सांगितलं.
देशातील १३ राज्यांमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात उद्धव ठाकरे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाविकास आघाडीतही आनंद व्यक्त होत आहे.देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्री अनेक कारणांमधून चर्चेत असतात. उत्तर प्रदेश या भल्यामोठ्या राज्यापासून उत्तराखंडसारख्या छोट्या राज्यांपर्यंत या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून अव्वल स्थान पटकावलं आहे.
‘प्रेश्नम’नं देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेची चाचणी घेण्यासाठी ‘मुख्यमंत्री त्रैमासिक मान्यता रेटिंग’, सुरू केला. त्यामध्ये पहिली यादी १३ राज्यांचा समावेश करण्यात आला होता.
त्यामध्ये बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांचा समावेश होता. यामध्ये एकूण ६७ टक्के भारतीय होते.
चाचणीच्या निकालात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती मिळाली. या सर्वेक्षणात ४९ टक्के लोकांना ठाकरे यांची कामगिरी पसंत पडली. आम्ही पुन्हा ठाकरेंना मतदान करणार, अशी लोकांनी प्रतिक्रिया दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थान मिळवलेले आहे. त्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना ४४ टक्के लोकांची पसंती मिळाली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना ४० टक्के मतं मिळाली, ते तिसऱ्या स्थानावर आले.
राज्यातील विरोधी पक्षनेते भाजपनं मात्र यावरून सरकारला खोचक टोला हाणला आहे.
‘प्रश्नम’ या संस्थेनं अलीकडंच १३ राज्यांमध्ये एक पाहणी केली होती. त्या त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या कामाबाबत नागरिकांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली. ‘मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असून आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू’ असं मत ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पाचव्या स्थानी आहेत. त्यावरून भाजपला चिमटेही काढण्यात येत होते.
महाराष्ट्र भाजपनं आता या सर्वेक्षणाबद्दल आपलं मत नोंदवलं आहे. राज्य भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘महाराष्ट्रातल्या एक हजार लोकांमध्ये झालेल्या सर्वेक्षणात ६०० लोकांनी मते दिली. या आधारावर उद्धव ठाकरे हे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. एवढीच मते मिळवायची होती तर १३ राज्यांत वणवण करण्याची काय गरज होती? एखाद्या हाउसिंग कॅाम्प्लेक्समधील निवडणुकीतही जास्त मतदार भेटले असते आणि ‘लोकप्रियता’ही कळली असती,’ असा खोचक टोला उपाध्ये यांनी हाणला आहे.
प्रश्नम’च्या या सर्वेक्षणात मुख्यमंत्री ठाकरे यांच्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्याबद्दल ४४ टक्के लोकांनी सकारात्मक मत नोंदवलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे तिसऱ्या स्थानी असून ४० टक्के मतदारांनी त्यांना पारड्यात मतं टाकली आहेत. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन चौथ्या तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाचव्या स्थानी आहेत.
१३ राज्यातील १७ हजार ५०० मतदारांचं सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढण्यात आला. तुम्हाला तुमच्या मुख्यमंत्र्यांचं काम कसं वाटतं? त्यांच्या कामाची पद्धत आवडते का?, असे प्रश्न या चाचणीत विचारण्यात आले होते. योग्य पर्याय निवडायचा होता. यानंतर मुख्यमंत्र्यांचे कौतुक काहीजण करत आहेत तर काहीजण आता मुख्यमंत्र्यांवर टीका करू लागले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असतील तर वाझे हे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी हे आजच्या युगातील तेनाली रामन असावेत,’ असं म्हणत अतुल भातखळकर यांनी खिल्ली उडवली आहे.
तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील उपरोधिक शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आज. ‘पुण्यात अशी म्हणायची पद्धत आहे लक्ष्मी रोडची मिसळ जगात भारी पुण्याची मस्तानी जगात भारी चितळेंची बाकरवडी जगात भारी तसाच तो सर्वे वाटतोय आमचा मुख्यमंत्री जगात भारी.’ असा टोला देशपांडे यांनी ट्वीट करून लगावला आहे.
याबाबत ’द प्रिंट’ने वृत्त दिले असून त्यानुसार, 13 राज्यात मिळून 17 हजार 500 जणांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्यांना
- मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब आहे आणि त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये.
- कामगिरी चांगली असली तरी पुन्हा मत देणार नाही.
- मुख्यमंत्र्यांचे काम चांगले आहे आणि पुढच्यावेळी हेच मुख्यमंत्री हवेत.
असे तीन पर्याय देण्यात आले होते.
वरील सर्वेत लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, यावर उत्तर देताना सर्वाधिक मते ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळाली आहेत.
सर्वेक्षणात जवळपास 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचे आणि त्यांना पुन्हा मत देऊ असे म्हटले आहे.
प्रश्नमच्या सर्वेक्षणात दुसर्या क्रमांकावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असून त्यांना 44 टक्के मते मिळाली आहेत. तर तिसर्या स्थानी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आहेत. लोकप्रिय नसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांना 60 टक्के लोकांनी मत दिले आहे.
त्यांची कामगिरी खराब असून ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नकोत असे म्हटले आहे.
भाजपाला सत्तेतून खाली खेचत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन केले. गेल्या दीड वर्षात सरकारने अनेक संकटाचा सामना केला आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आशा परिस्थितीतही उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान पटकावलं आहे. प्रश्नम या संस्थेने देशातील प्रमुख 13 राज्यांत सर्वेक्षण घेतले असून त्यात इतर मुख्यमंत्र्यांना मात देत उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय ठरले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”, असे ते म्हणाले.
‘आमच्या वर्गात एक मुलगा होता. तो अभ्यास करायचा नाही. पण तो वर्गात नंबर वन यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असेच मुंख्यमंत्र्यांचे आहे’, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात काय केलं?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.
पाच सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचे दोन मुख्यमंत्री आहेत तर भाजपचा पाठिंबा असलेल्या एका मुख्ममंत्र्याचा समावेश आहे. म्हणजेच खराब कामगिरी करणाऱ्या पाचपैकी तीन मुख्यमंत्री भाजपचे आहेत. तामिळनाडूत पलानीस्वामींना भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे. या सर्वेक्षणात देशातील ३१ मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रीयतेचा कल जाणून घेण्यात आला आहे. हे सर्वेक्षण देशातील ५४३ लोकसभा क्षेत्रात करण्यात आले आहे. यामध्ये ३० हजार जाणांनी सहभाग नोंदवला आहे.
चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री
नवीन पटनायक (ओडिशा)
अरविंद केजरीवाल (दिल्ली)
जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश)
पी. विजयन (केरळ)
उद्धव ठाकरे (महाराष्ट्र)
भूपेश बघेल (छत्तीसगड)
ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)
शिवराजसिंह चौहान (मध्य प्रदेश)
प्रमोद सावंत (गोवा)
विजय रुपाणी (गुजरात)
खराब कामगिरी करणारे मुख्यमंत्री
त्रिवेंद्रसिंह रावत (उत्तराखंड)
मनोहरलाल खट्टर (हरयाणा)
कॅप्टन अमरिंदर सिंह (पंजाब)
के. चंद्रशेखर राव (तेलंगाणा)
के. पलानीस्वामी (तामिळनाडू).
लोकप्रिय मुख्यमंत्री हे कोणाचे सर्वेक्षण आहे मला माहिती नाही. ते मी पाहिले नाही; पण कोणाला ते लोकप्रिय वाटत असतील तर चांगलं आहे. महाराष्ट्र सरकारने कोविडसंदर्भात चांगलं काम केलं पाहिजे एवढीच सध्या अपेक्षा आहे. मुंबईतल्या लोकांना दिलासा मिळाला पाहिजे. मुंबईतल्या लोकांची आजची अवस्था अत्यंत वाईट आहे. आरोग्य सेवांसंदर्भातील एका व्हिडीओचा दाखला देत फडणवीस म्हणाले, “आपण सोशल मीडियावर जाऊन जर मुंबईची अवस्था बघितली तर कोण किती लोकप्रिय आहे हे आपल्या लक्षात येईल.
माझ्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा आहेत. ” असे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. लोकप्रिय मुख्यमंत्री यादीत पाचव्या क्रमांकावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव आल्यानंतर फडणवीस यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. लाईव्ह पत्रकार परिषदेत पत्रकारांनी लोकप्रिय मुख्यमंत्रीचा मुद्दा छेडल्यानंतर फडणवीस यांनी उत्तर दिले. त्याचप्रमाणे त्यांनी शिवसेनेला टोलादेखील हाणला आहे. “शिवसेना आमच्यासोबत पाच वर्षे सत्तेत होती तेव्हाही त्यांनी विरोधी पक्षाचंच काम केलं.
ते कधीच एका भूमिकेवर ठाम राहिले नाही. रोज भूमिका बदलयाची हे त्यांचं धोरण. एक दिवस म्हणायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करत आहेत. काही दिवसांनी मोदींवर टीका करायची. एकदा राज्यपालांना नावं ठेवायची, नंतर कुनिर्सात करायचा. फक्त टीकेसाठी टीका करायची असं शिवसेनेचं धोरण आहे. त्या टीकेला अर्थ, तत्त्व आणि मूल्य नाही. ” असा टोला फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना शाबासकी दिली. उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारीच्या काळात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे.
त्यामुळे ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीदरम्यान पवारांनी मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. दरम्यान, प्रश्नमने केलेल्या सर्वेक्षनानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाकाळात उत्तम कामगिरी केल्यामुळे सर्वाधिक पसंती मिळवली.
सर्वेक्षण करणाऱ्या ‘प्रश्नम’ या संस्थेने आपला त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. यात हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.
‘प्रश्नम’ ही एक टेक्नोलॉजी आंत्रप्रन्योर असलेले राजेश जैन यांची मार्केट रिसर्च एजन्सी आहे. ज्याची स्थापना २०१२ मध्ये करण्यात आली होती. या माध्यमातून सर्व्हेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात असतो. देशात अलीकडील काळात जे काही गाजलेले सर्वे आणि त्याच्या बातम्या झाल्या होत्या त्यातील अनेक सर्वे हे प्रश्नमकडूनच करण्यात आले होते.
यात काही सर्वेंची नाव सांगायची झाली तर, सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या हा निवडणूक काळातील राजकीय प्रचाराचा मुद्दा बनवला जावा का? कुंभमेळा आयोजित करण्याचा निर्णय योग्य होता का? कोरोना काळात ऑनलाईन क्लासचा लाभ किती मुलांना झाला? असे काही चर्चेत आलेले सर्वे प्रश्नम कडून करण्यात आले होते.
सोबतच राजकीय सर्वेंबाबत सांगायचं झालं तर मागच्या महिन्यात या संस्थेनं सर्वेक्षण केलेला विषय होता तो म्हणजे पुढचे पंतप्रधान कोण असावे? यात नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक ३२ टक्के मत मिळालं होतं. सोबतच पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावं यावर देखील प्रश्नम कडून सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यात सार्वधिक ६३ टक्के मत ममता बॅनर्जी यांना मिळाली होती.
आता हा झाला कंपनीचा सगळा वर्तमान. मात्र भिडूनों, भूतकाळ देखील जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला बरंच पाठीमागे जावं लागत. सोबतच त्यासाठी आधी ‘प्रश्नम’चे संस्थापक राजेश जैन यांच्याबद्दल देखील जाणून घेणं गरजेचं आहे.
संस्थापक राजेश जैन यांच्याविषयी माहिती सांगायची झाली, तर त्यांचं १९८८ साली बॉम्बे आयआयटी मधून बी.टेकच शिक्षण पूर्ण झालयं. त्यानंतर त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून एम.एस. पूर्ण केलं. पुढे १९९२ पर्यंत NYNEX या अमेरिकन संस्थेसाठी काम करून ते उद्योजक होण्यासाठी भारतात परतले.
या नंतरच्या काळात राजेश यांनी भारतात टेक्नॉलॉजीमध्ये बरच काम केलं. त्यांनी १९९५ साली भारतातील पहिले इंटरनेट पोर्टल लॉन्च केलं होतं. सत्यम इन्फोव्हेस म्हणून कंपनी सुरु केली. इथून त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. १९९९ पर्यंत या कंपनीची मार्केट वॅल्यू जवळपास ५०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली होती.
त्यांच्या कामाची माध्यमांनी सुद्धा दखल घेतली. २००० साली TIME मॅगझीनकडून त्यांची कव्हर स्टोरी करण्यात आली. सोबतच २००७ मध्ये देखील Newsweek कडून राजेश यांच्यावर कव्हर स्टोरी करण्यात आली.
राजेश यांनी आपल्या rajeshjain.com या वेबसाईटवर सांगितलेल्या माहितीप्रमाणे,
२००८ साली राजेश यांनी राजकीय क्षेत्रात इंटरनेट आणि सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करायचं ठरवलं. यातूनच २००९ साली स्थापना झाली ‘नीती डिजिटल’ची. पुढे ते भाजपच्या जवळ गेले. त्यांनी शहरी मध्यमवर्गीयांचा भाजपाला पाठिंबा मिळावा यासाठी फ्रेंड्स ऑफ बीजेपी या ग्रुपची स्थापना केली. तर २०१० मध्ये राजेश यांनी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी नरेंद्र मोदींना सांगितले कि, २०१४ मध्ये तुम्हाला देशाचं पंतप्रधान बनवण्यासाठी काम करायला मला आवडेल. मोदींनी देखील राजेश यांना या कामासाठी होकार दिला.
राजेश यांनी आपल्या ब्लॉगवर त्याच वेळी एक लेख लिहिला, ज्याचं टायटल होतं,
“Project 275 for 2014”
यात त्यांनी भाजप कसा स्वतःच्या बळावर २०१४ च्या निवडणुकांमध्ये बहुमत मिळवू शकतो या बद्दल अभ्यासपूर्ण मत मांडलं. थोडक्यात त्यांनी मोदींना तुम्ही पंतप्रधान नक्की होऊ शकता याबद्दलचा विश्वास दिला. त्यानंतर त्यांनी १०० जणांना घेऊन माध्यम, डाटा आणि टेक्नॉलॉजी या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या कॅम्पनिंग करण्यासाठी नीती डिजिटलची स्थापना केली.
याच नीती डिजिटलच काम सुरु असताना राजेश जैन हे अनेक सर्वे करायचे. यातूनच त्यांना २०१२ साली ‘प्रश्नम’ची कल्पना सुचली. २०१४ मध्ये प्रश्नमने गती घेतली. उत्तरप्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमध्ये प्रश्नम कडून मतदारांचे निवडणूक पूर्व आणि निवडणुकीनंतर सर्वे करण्यात आले.
२०१४ च्या निवडणुकीनंतर प्रश्नमने देशातील विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर सर्वेक्षण करण्याचं काम सुरु केलं. ते अजूनही चालू आहे.
राजेश जैन यांच्या मते, सर्वेक्षणामध्ये स्वभाव ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि लोकसंख्या स्वभावाच प्रतिनिधित्व करते. जर लोकसंख्याशास्त्रानुसार वेगवेगळ्या आणि प्रमुख लोकांचं मत जाणून घेतलं, यात मग काही ग्रामीण भागातील, काही शहरी भागातील, स्त्री आणि पुरुष अशा लोकांच मत जाणून घेतलं जातं.
जर वेगवेगळ्या भागातील लोकांचं मत असेल तर १००० लोकांचं मत देखील अंदाज लावण्यासाठी, काही निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसं असतं. जैन यांचं एक वाक्य बरंच आवडीचं आहे. ते म्हणजे,
“Our basic idea is that we want to transform surveys”
ते म्हणतात, जे गुगल माहितीच्या बाबतीत करतात तेच आम्हाला लोकांच्या मतांच्या बाबतीत करायचं आहे. त्यानंतरच्या काळात प्रश्नमकडून टेलिफोनिक सर्वे सुरु करण्यात आले. ज्याच्या सध्याच्या लॉकडाऊन काळात प्रश्नमला बराच फायदा झाला.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे चांगलं काम करत असल्याचं नमूद करत ते लोकप्रिय ठरल्याचं सांगितलं. तसेच उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा, असंही मत नोंदवलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. ते पुण्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा म्हटल्यानं त्यांना काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाचा विसर पडला की काय? असा प्रश्न विचारला जात आहे. यावरुन सोशल मीडियावर राजकीय टोलेबाजीही सुरू झालीय.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मोदी सरकारने सरकार स्थापनेपासून 32 ते 35 लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. त्याचा तोटा भरुन काढण्यासाठी कर वाढ केली जात आहे. मोदी सरकार हा तोटा भरून काढण्यासाठी कर्ज तर काढतंय. त्याचबरोबर देशातल्या बँका विकणं, कंपन्या विकणं, एलआयसीचे खासगीकरण करणे असेही प्रकार सुरू आहेत. हे सर्व अत्यंत निंदनीय काम सुरु आहे. काँग्रेसने जे कमावलं ते मोदी सरकारने गमावलं. कंबरतोड करणारी इंधन दरवाढ केंद्राने मागे घ्यावी.”
“कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहे. दोषी ठरल्यावर कारवाई करा. आधीच्या काळात असं होतं नव्हतं. खडसे यांनी पक्ष बदलल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. भाजपात धुतल्या तांदळासारखे होते आणि नंतर काय झालं? देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात, दिशाभूल करणारी विधानं करतात. देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलतात हे मी सांगत नाही. मी आकडे मांडले आहेत. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी काय निर्णय घेतले?” असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटू शकतात.
संपादकीय
गंगाधर ढवळे,नांदेड