कंधार ; प्रतिनिधी
कंधार ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सेवा द्यावी यासाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कंधार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे ग्रामीण रुग्णालयात टि.टि.इंजेक्शन, मलमपट्टी साहित्य ,ड्रेसिंग साहित्य ,खोकल्याचे औषध तसेच बऱ्याच अत्यावश्यक औषधांचा साठा संपलेला असून त्यामुळे तालुक्यातील सामान्य जनतेचे हाल होत आहेत.
सदरील औषधे सहा-सात महिने झाले तरी उपलब्ध नाही त्यामुळे औषध तात्काळ उपलब्ध करून दयावेत सदरील औषधांचा पुरवठा लवकरात लवकर उपलब्ध झाला नाही तर संभाजी ब्रिगेड कंधार च्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी उपस्थित मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष बळीराम पाटील पवार , मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष शिवराज मंगनाळे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नितीन पाटील कोकाटे ,संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष विकास पाटील लूगांरे ,संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष धनंजय पाटील कौसल्ये,देवा ग्रुप तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील वरपडे ,संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष संभाजी पाटील गायकवाड, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष नितीन पाटील कौशल्ये, शंकर बोरगे व उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित होते.