कंधार ; प्रतिनिधी
देशात 12 सप्टेंबर 2021 ला होणार्या निट परीक्षेत ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात यावे या मागणीच्या निवेदन मा. कंधार तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अॅड.अंगद केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष माधवराव पवार यांच्या वतीने आज मंगळवार दि.२७ जुलै रोजी देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता. उपाध्यक्ष गोपीनाथराव केंद्रे, परसूराम केंद्रे, विद्यार्थी आघाडीचे शहरअध्यक्ष तारकेस तपासे, अरबाज शेख, समिर शेख उपस्थित होते.

