कंधार ; प्रतिनिधी
सततची नापिकी व बँकेचे कर्ज बचत गटाचे कर्ज आणि पावसामुळे दुबार पेरणीचे संकट यामुळे कंधार तालुक्यातील लिंबाचीवाडी इमाम वाडी येथील संभाजी विठ्ठल जिंके वय 42 या शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या दिनांक २७ जुलै रोजी केली आहे.
संभाजी विठ्ठल जिंके यांनी बचत गटाचे कर्ज व बँकेचे कर्ज घेतले होते त्यात सतत नापिकी व पावसाने दुबार पेरणीचे संकट असे संकटात सापडलेल्या संभाजी विठ्ठल जिंके यांनी टोकाची भूमिका घेत दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
संभाजी विठ्ठल जिंके यांच्या पश्चात दोन मुले ,पत्नी, बहीण भाऊ असा परिवार आहे.या घटनेची माहिती आजदि.२८ जुलै रोजी सरपंच प्रतिनिधी प्रकाश पाटील बुरकुले यांनी पोलिस प्रशासनाला दिली त्यावरून पंचनाम्याची कारवाई चालू होती. घटनास्थळी सदर घटनेची माहिती मिळताच माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी धाव घेऊन घटनेची पाहणी केली व पोलीसांना पंचनामा करण्यासाठी सांगितले आले.दरम्यान कंधार येथिल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.