नवीन नांदेड:(प्रतिनिधी)/०१
आज साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त
निळकंठे इलेट्रिकल्स परिवारातर्फे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती.
या वेळी प्रमुख उपस्थिती सिडको ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.अशोक घोरबांड यांच्या शुभहस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
या प्रसंगी श्री अशोक घोरबांड यांनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रत्येकांनी आत्मसात करावे,केवळ जाती पातीच्या भिंती पाडून सर्व महामानवांनी दिलेला विचार हा वाचून कसे जीवनात अंमलात आणता येतील त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि जात विरहीत समाज,अंधश्रद्धा मुक्त ,युवा पिढी ही व्यसनाच्या प्रचंड प्रमाणात गेली आहे त्यांना या विळख्यातून मुक्त केलं पाहिजे तरच या जयंतीचे सार्थक झाले’ असे प्रतिपादन अशोक घोरबांड मनोगतात व्यक्त केले.
या प्रसंगी उपस्थित दलितमित्र नारायणराव कोलंबीकर,डॉ.रमेश शिवणकर,आनंदा गायकवाड,विठ्ठल घाटे,बालाजी कदम,भाकपा युनायटेड राज्य उपाध्यक्ष प्रा.इरवंत सुर्यकार, जिल्हामहासचिव प्रा.देवीदास इंगळे,सहशिक्षक बालाजी पाटोळे,बाबू कांबळे,ग्राविअ श्री.व्यंकटेश बैलकवाड,संदीप जिल्हेवाड, प्रा.संघपाल कांबळे, आशिर्वाद बोयवारे, गंगाधर गजले, दिनेश भरकड,आयोजक सुजितकुमार निळकंठे, मनोजकुमार निळकंठे यांनी केले. यावेळी समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.