कंधार ; प्रतिनिधी
कंधार शहरातील बसवेश्वर किराणा कंधार, सराफा, लाईन, गांधी चौक, श्री वैजनाथ दिलेराव यांच्या गिरणी (चक्की) पर्यंत नवीन रस्ता करणे व तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराणा प्रताप चौक पर्यंत नवीन रस्ता करा आशी मागणी
मा.मुख्याधिकारी विजय चव्हाण यांना आज दि.३ रोजी निवेदनाद्वारे संयुक्त ग्रुप च्या वतीने करण्यात आली आहे.
कंधार शहरातील मुख्य रस्ते बऱ्याच वर्षापासून नवीन रस्ते करण्यात आले नाहीत रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली असून नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे. दुर्दैवाने जर रस्त्यावरील खड्डयांमुळे कुणाची जीवित किंवा वित्तहानी झाली तर त्यास जबाबदार कोण राहील. ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांची देखील या रस्त्यावर वर्दळ असते कोणतीही दुर्घटना होण्यातत्पूर्वी मुख्याधिकारी तात्काळ या मागणीची दखल घ्यावी ही व काम सुरु करावे असे निवेदनाद्वारे संयुक्त ग्रुपच्या वतीनेनिवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर
साईनाथ भगवानराव मळगे (संस्थापक अध्यक्ष संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य),
विजेंद्र मिलिंदराव कांबळे (तालुका अध्यक्ष कंधार),
विलास लक्ष्मणराव कांबळे (भारतीय बौद्ध महासभा कंधार),
कैलास अशोक इंगळे
(किसान क्रांती सेना तालुका उपाध्यक्ष),
चांदू पंढरी इंगळे (किसान क्रांती सेना तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष कंधार),
मोहम्मद सोहेल, रोहित तमखाने , चौधरी सरफराज आदीची यावेळी उपस्थिती होती.