कलंबर येथे दहा लक्ष,जोशीसांगवी येथे पाच लक्ष रुपये कामाच्या आ. शिंदे यांच्या हस्ते सि सि रस्त्याचे भूमिपूजन
लोहा( प्रतिनिधी)
तालुक्यातील जोशी सांगवी येथे आमदार स्थानिक विकास निधी च्या पाच लक्ष रुपये कामाचे व कलंबर येथे दहा लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन व पिठाच्या गिरणी चे उद्घाटन मंगळवार दि. 3 जुलै रोजी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित गावकऱ्यांच्या वतीने आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी व्यासपीठावरून उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधताना आ. शिंदे म्हणाले की जोशी सांगवी सह वडेपुरी सर्कल ला मॉडेल बनवण्याचा माझा मनस्वी माणस असून यासाठी मी मंत्रालय स्तरावर वेळोवेळी प्रयत्न करत आहे, लोहा -कंधार मतदार संघातील शेतकरी, कष्टकरी, दीनदलित, वंचित, भटक्या समाजासाठी व समाजातील सर्वात शेवटच्या घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मी सदैव काम करणार असून लोहा, कंधार मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, मतदार संघाच्या मूलभूत विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार शामसुंदर शिंदे यांनी बोलताना दिली .
लोहा -कंधार मतदार संघात दर्जेदार रस्ते, शिक्षण ,आरोग्य, सिंचन, वीज, पिण्याचे पाणी, शेती विकास, महिला सक्षमीकरणासाठी येणाऱ्या काळात मी प्रथम प्राधान्य देऊन यांचा विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.यावेळी कलंबर येथे अपंगांना साहित्य वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला धर्माजी पा. जगदाळे ,मनुशिंग ठाकूर, माजी जि.प.सदस्य बालाजी परदेशी,कैलास मेहर,भोकरे गुरुजी,गणेश मलकापुरे,अशोक पा. लोंढे ,विक्रम टरके, सरपंच वंदना थोटे, उपसरपंच आरती मोरे, सरपंच शिवाजी कदम, जिल्हाध्यक्ष योगेश पाटील नंदनवन कर ,पार्वती शिंदे ,आनंद देशमुख, चक्रधर मोरे, माजी सरपंच बळी गो मस्कर ,बाळू आनंद वाड, विश्वनाथ लोंढे, बापूराव चेअरमन किवळेकर, शेख युसूफ सह कार्यकर्ते पदाधिकारी ,गावकरी मोठ्या संख्येने सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.