नांदेड ; प्रतिनिधी
डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी 1989 मध्ये स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीनिवास शिंदे तर प्रधान सचिवपदी डॉ. बाळू दुगडूमवार यांची निवड करण्या आली.
महाराष्ट्र अंनिसची नांदेड जिल्हा कार्यकारिणीची बैठक 1ऑगस्ट रोजी पार पडली. रिक्त झालेल्या पदांवर निवड करण्यासाठी जिल्हाध्यक्ष गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी निरीक्षक म्हणुन महा.अंनिस चे राज्य प्रधान सचिव माधव बावगे आणि राज्य सरचिटणीस हरिदास तम्मेवर यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच जिल्ह्यातील बहुतेक शाखांचे प्रतिनिधी हजर होते.
नवीन जिल्हा कार्यकारिणी खालीलप्रमाणे: जिल्हाध्यक्ष गुणवंतराव पाटील, जिल्हाउपाध्यक्ष डॉ.किरण चिद्रावार, डॉ. अशोक बेलखोडे, बालाजी कोंपलवार, कार्याध्यक्ष श्रीनिवास शिंदे, प्रधान सचिव डॉ.बाळु दुगडूमवार व प्रा डॉ सिद्धेवाड, विविध उपक्रम कार्यवाह गणेश पाटील, बुवाबाजी विरोधी संघर्ष कार्यवाह राजकुमार अडगुलवार, कायदे विषयक सल्लागार ॲड धोंडीबा पवार, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण कार्यवाह संजय ठिकाणे, सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह गजानन जाधव, युवा सहभाग कार्यवाह विशाखा साळी, प्रशिक्षण विभाग कार्यवाह प्रा.डॉ. परमेश्वर पौळ, महिला सहभाग कार्यवाह पुष्पा कोकीळ व राणीपद्मावती बंडेवार, जातीअंत संकल्प विभाग अंतर्गत मिश्र विवाह विभाग कार्यवाह दिगंबर सत्वधार, जोडीदाराची विवेकी निवड कार्यवाह आत्राम बुद्धेवाड, जात पंचायती मूठमाती कार्यवाह दिपाली हाडोळे, मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग प्रतिभा कोकरे, ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ कार्यवाह सम्यक सर्पे, प्रकाशने वितरण कार्यवाह सदानंद वडजे, निधी संकलन विभाग कार्यवाह शंकर जाधव, सोशल मीडिया व्यवस्थापन माधव टेंभुर्णे यांची निवड करण्यात आली.
नवीन जिल्हा कार्यकारिणीने पुढील काळात नांदेड जिल्ह्यात सर्व तालुक्यात संघटनेचा वाढ विस्तार करण्याबाबत नियोजन केले. त्याच प्रमाणे 9 ऑगस्ट संघटना स्थापना दिन आणि 20 ऑगस्ट शहीद नरेंद्र दाभोलकर स्मृती दिन त्याविषयीचे कृती कार्यक्रम ठरवले.
निरीक्षक आणि अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीचे नियोजन आणि सुत्रसंचालन तुळशीदास शिंदे यांनी केले.