सतिश देवकते …मैत्रीच निखळं रसायन
सामाजिक ,शैक्षणिक व राजकीय कार्यात सदैव अग्रेसर असणारे कंधार येथील परिचित व्यक्ती व व्यासपिठ तसेच राजकीय कार्यात काँग्रेस पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख ,मिडीया प्रमुख म्हणून २४ तास वेळ देवून तळमळीने कार्य करणारा एक सच्चा मित्र…नव्हे तर समस्त मामा मित्र मंडळाचे मित्र म्हणजे …सतीश देवकते सर..सतीश देवकत्ते म्हणजे मैत्रीच निखळं रसायनच होय.
कंधार तालुक्यातील कुरुळा येथिल आयोजित मातंग समाज समाजाच्या मेळाव्यात सतीश देवकत्ते सर आणि माझा परिचय झाला आणि त्यातून त्यांच्या बुद्धीची क्षमता, कौशल्य, व्याप्ती कळली आणि मी मारोती मामा आणि सतिश देवकत्ते सर यांची मैत्री च घट्ट नात जडले.
मैत्री झाल्या नंतर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सतीश देवकते यांचे मला सदैव मार्गदर्शन झालेला आहे .केवळ मलाच नाही तर समाजातील दीन दलित, दुबळ्या, उपेक्षित समाजाच्या हितासाठी व देऊन सदैव पुढे असणारा हा एक सच्चा मित्र होय,
कोणत्याही समाजाचा कार्यक्रम असो,किंवा कार्यकर्त्याचा वाढदिवस असो किंवा मामा मित्र मंडळाच्या कोणत्याही मित्राचा वाढदिवस असो सतिश देवकते सर त्या ठिकाणी उपस्थित राहणार ,सूत्रसंचालनाची डोर आपल्या हातात घेणार आणि तो कार्यक्रम जणू आपलाच आहे. त्या कार्यक्रमाचा भाग होऊन मिसळून जातात असे आमचे सतीश देवकते सर … माझ्या समजातील विविध चळवळीचे जित्ते जागते व्यासपिठ आहेत.साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्य विविध आयोजित कार्यक्रमात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवन चरीत्रावर अभ्यासपूर्ण मांडणी करुन अण्णाभाऊ साठे सर्वांना कळावे म्हणून अभ्यासपुर्ण भाषणातून मातंग समाजाला जागे करण्याचे काम आपल्या भाषणशैलीतून सतीश देवकत्ते करतात.
कोरोना संकट काळात त्यांचा घरावर संकट कोसळले त्यांच्या वडीलांचे निधन झाले.ते डगमगले नाहीत ख-या अर्र्थाने एका मोठ्या राजकीय पक्षाचे सोशल मिडीया प्रमुखाची भुमीका आपल्या कृतीतून केली. वडीलांच्या अंत्यसंस्कार नंतरच्या अनेक संस्काराला नाममात्र करत कोरोना संकट काळात जीवंत माणसांना अन्नदान करुन आपल्या वडीलांना श्रद्धांजली वाहीली असा हा सच्चा मित्र…
भविष्यात ही त्यांच्या हातून शैक्षणिक ,राजकीय व धार्मिक कार्यात मदत मिळणारच यामध्ये तिळ मात्र शंका नाही.ज्यांना सतिश देवकत्ते सर समजले दिसले तसे ओळखतात .पण मला अनेक अंगापैकी त्यांचे मी सादर केलेले अंग फार भाळले आहे आणि हे माझे वैयक्तिक मत आहे.
देवकते सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ..
मारोती मामा गायकवाड ,संस्थापक मामा मित्र मंडळ कंधार.