शताब्दीवीर माजी खासदार व आ. डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांचा 57 वर्षापुर्वीचा विडा आणि सौ.चंद्रप्रभावती धोंडगे ..


आधी लगीन ..श्री शिवाजी कॉलेजचे……

आपल्या देशात विवाहाचा मुहुर्त पाहुन पारंपारिक विवाहाचे आयोजन केले जाते.प्रत्येक मानवांच्या जीवनात 16 संस्कार येतात त्यापैकी 15 वा संस्कार म्हणजे विवाह संस्कार येतो.डाॅ.भाई धोंडगे यांचा विवाह चाळीसी ओलांडल्या नंतर झाला.मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या हयातीत हा विवाह भोपाळगड ता.गंगाखेड सद्याचा तालुका पालम येथील घरंदाज जाधन पाटलांची लाडकी कन्या चंद्रप्रभावती यांच्या सोबत राष्ट्रीय सण 15 ऑगस्टच्या राष्ट्रीय दिनास पंचांग न पाहता आयोजित केला गेला.
त्यांच्या विवाहात अनेक अटी होत्या.


त्यांनी लग्ना आधी सोनखेड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने श्री शिवाजी विद्यालयाच्या उघ्दाटन समारंभात शपथ घेतली आधी लग्न श्री शिवाजी काॅलेज 
#माझ्या लग्नाचा मांडव गुरुनाथराव कुरुडे यांच्या घरी घातला जाईल.
# माझे लग्न स्वातंत्र्य दिनी पार पडेल.
# माझ्या विवाहात ब्राम्हण चालणार नाही.
#  करवली सौ.सुभद्राबाई कुरुडे(भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या मातोश्री) असतील.
# माझी आरोग्य तपासणी करावी.
# लग्नात सकोने म्हणुन वैजनाथ व जगन्नाथ(भाई गुरुनाथरावाचे बंधु)  कुरुडे राहतील.
अशा अटी टाकुन विवाहास तयारी दर्शवली.या लग्नात वर दक्षिणा म्हणुन दिलेली रक्कम श्री शिवाजी काॅलेज कंधारच्या कर्मचार्यांच्या पगारात लावली.
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरीत मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात धारातिर्थी पडलेल्या 105 हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या टावरच्या एकदम पुढे छ.शिवाजी महाराजांचा पुतळा वर दक्षिणा म्हणुन केरवाडी(भोपाळगड) येथील जाधव पाटील परिवारांनी क्रांताभुवन बहाद्दरपुरी धोंडगे परिवास सस्नेह भेट देवुन इतिहास घडविला.


इकडे 15 ऑगस्ट 1963 ला भोपाळगड केरवाडी(अजमाबाद) विवाहासाठी नगरी सजली.बहाद्दरपुरा येथुन 51 बैलगाड्यांत वर्हाड मंडळी केरवाडीकडे निघाली.लग्न मंडपाकडे येणारा प्रत्येक पाहुणा चर्चा करु लागला.नवरदेव आमदार आहे म्हणं,कोणी म्हणत होते नवरदेव आमदाराचा मुलगा हात म्हणं !….अन् पंचांग,मुहुर्त कांहीच बघीतल नाही म्हणे…अस कसे लगीन म्हणावं.. अरं 15 अॉगस्टाला कराचे म्हणुन केले.केरवाडी पंचक्रोशितील सर्वजण जमा झाले.लग्नाची सर्व तयारी झाली.अक्षता वाटप झाल्या.इकडे नवरदेव आमदार म्हणटल्या नंतर कांही जण लग्नाला तर कांही जण आमदार नवरदेव बघायला तोबा गर्दी जमली.अक्षदा वाटप केल्या.त्या उमेदीत भाई केशवरावजी धोंडगे यांचे वकृत्व उमेदीतले नवरी चंद्रप्रभावती जाधव या घरातच होत्या मंगलाष्टक म्हणन्या आधी नवरदेवाचे भाषण सुरु झाले.
अघा झालेवते नवलच!


भाषण संपल्या-संपल्या अक्षदा नवरदेवाच्या दिशेने भिरकावले अन् टाळ्यांचा कटकडाट झाला.असे अनोखे लग्न पार पडले.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन हे एकमेव लग्न झाले असावे.नविन नवरी ह.भ.प.माणिकराव कुरुडे यांचे निवासस्थानी आली.भाई गुरुनाथरावांनी आपले शयनकक्ष भाई केशवरावजी व सौ.चंद्रप्रभावती यांच्यासाठी देवुन टाकला.जवळपास मातोश्री मुक्ताई धोंडगे व सौ.चंद्रप्रभावतीबाई या सासु-सुना जवळपास एक वर्ष सोबत राहिल्या आखाडी करीच्या दुसर्यादिवशी 26 जुलै 1964 रोजी सायंकाळी रविवारी मातोश्री मुक्ताई बाळ केशवाला पोरके करुन या जगाचा निरोप घेतला.यांच्या विवाहास आज 57 वर्ष झाली.त्यांच्या संसार वेलीवर सात रत्न जन्मले पहिले कन्यारत्न प्रा.चित्राताई दिगंबरराव लुंगारे,दुसरे कन्यारत्न कवि सौ.भागेरथा तातेराव आहेर, पहिले पुत्ररत्न अॅड.मुक्तेश्वर भाऊ धोंडगे,तिसरे कन्यारत्न सौ.जयक्रांति अशोकराव गवते,चौथे कन्यारत्न सौ.मनकर्णिका कामाजीराव जाधव,व्दितीय पुत्ररत्न डाॅ.प्रा.पुरुषोत्तम भाऊ धोंडगे तर पाचवे कन्यारत्न सौ.भाग्यश्री अमितराव दापके असा संसारवेल बहरला.
डाॅ.भाई केशवराव धोंडगे आणि त्यांच्या अधिश्वरी सौ.चंद्रप्रभावती केशवराव धोंडगे यांच्या 57 व्या विवाह वाढदिवसाच्या निमित्याने सौभाग्य सदिच्छा व मानाची कोटी-कोटी जयक्रांति! 

दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,

#सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार.                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *