कंधार ;
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि.१५ अॉगस्ट रोजी औरंगाबाद स्थित असलेल्या नांदेड जिल्हा मित्र मंडळ या सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार धोंडीबा बोरगावे (दै. सकाळ )यांनी केलेल्या विविध कार्याची दखल घेत कोरोनावीर ( कोविड योद्धा ) म्हणून निवड केली आहे.
आज ७४ वा स्वातंत्र्य दिन , झेंडावंदनसाठी निघण्याची तयारी करत असताना अचानक एक फोन आला. घाईगडबडीत तो फोन उचलला आणी तिकडून आवाज आला हॅलो मी औरंगाबाद येथून केशव पाटील नंदनवनकर बोलतोय, आणि क्षणाचाही विलंब न करता आपल्या सातत्यपूर्ण कामांचा आढावा घेता आम्ही आपली कोरोनावीर ( कोविड योद्धा ) म्हणून निवड केली असून तसे सन्मानपत्र पाठवत आहे आणि लवकरच आम्ही आपल्याला सदर सन्मानपत्र एका कार्यक्रमात देऊन गौरविणार आहोत , हे ऐकताच मनाला आनंद झाला आणि आपण सदैव केलेल्या निस्वार्थ कार्याची दखल घेणारे कोणीतरी आहेत याची नकळतपणे जाणीव झाली.
*वीस वर्षांपासून विविध माध्यमातून केलेल्या अनेक कार्याचा सारांश*.
१ डिसेंबर २००० रोजी पहिल्यांदा *पुण्यनगरी* या वर्तमानपत्रा साठी कंधार तालुक्यातील फुलवळ येथून प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेला सुरुवात केली आणि सलग तीन वर्षे काम केले. त्यानंतर २००३ ते २००६ या तीन वर्षात *देशोन्नती* या दैनिकासाठी येथूनच प्रतिनिधी म्हणून काम केले. तर २००६ पासून आजतागायत *दै. सकाळ* मध्ये बातमीदार म्हणून काम करत आहे. या वीस वर्षाच्या कालावधीत लेखणीच्या माध्यमातून वेळोवेळी अनेक बाबींना वाचा फोडत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. एवढेच नाही तर स्वतः *राजमाता बहुद्देशीय सेवा भावी संस्थेची* उभारणी केली आणि या संस्थेच्या माध्यमातून गावात विविध सामाजिक उपक्रम राबविले.
या सर्व बाबींचा तसेच गेली काही महिन्यांपासून भारत देशासह संबंध जग कोरोना या विषाणू ला लढा देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. त्याला तोंड देण्यासाठी जगाला लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण करावी लागली. *डॉक्टर , नर्सेस , पोलीस व इतर संबंधित अधिकारी , कर्मचारी आपापल्या क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या जीवाची पर्वा न करता सामाजिक भावना जपत निःस्वार्थपणे सेवा करीत आहेत. तसेच याकामी विविध माध्यमांचे प्रतिनिधी , *पत्रकार* ही कुठेच कमी नसून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाच्यापुढे वास्तवता पोहचवण्याचे काम करत आहेत. या कठीण काळातही “जनसेवा हिच ईश्वरसेवा” समजून केलेल्या कार्याचा कुठेतरी गौरव व्हावा यासाठी *नांदेड जिल्हा मित्र मंडळ* या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना *कोरोनावीर* ही सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सांगून यात पत्रकार म्हणून आम्ही आपली निवड केली असल्याचे सदर सामाजिक संस्थे संचालक नांदेड भूमिपुत्र केशव पाटील नंदवनकर यांनी सांगितले.
*नांदेड जिल्हा मित्र मंडळ* या संस्थेने संबंध महाराष्ट्र राज्यात विविध उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकीचा आपला एक आगळावेगळा ठसा उमटवला आहे , आणि याच संस्थेने माझ्यासख्या सामान्य माणसाच्या आजपर्यंत च्या विविध कामाची पोचपावती म्हणून आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केलेली निवड ही आपल्यासाठी गौरवास्पद असून यातून नव्याने पुन्हा काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि निस्वार्थपणे सातत्यपूर्ण केलेल्या कामाचे कुठेतरी मोजमाप नक्कीच होत असते याची नकळतपणे जाणीव झाली , कारण काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य च्या वतीनेही कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले होते त्याबद्दल त्यांचेही आणि नांदेड जिल्हा मित्र मंडळ या संस्थेचेही आपण आभार व्यक्त करतो अशी भावना पुरस्कार प्राप्त पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी व्यक्त केली.