नांदेड ; प्रतिनिधी
हनुमंत भोपाळे हे सतत वेगवेगळे विधायक उपक्रम राबवतात.त्यांनी नि:स्वार्थपणे प्रबोधनाचे कार्य केले आहे. त्यांच्या उपक्रमशील अशा व्यक्तिमत्वातून अनेक प्रेरणा मिळतात. उपक्रमशील व्यक्तिमत्त्व हनुमंत भोपाळे गौरव विशेषांक हा खरोखरच वाचकांना ऊर्जा देणारा आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते, अभिनेते तथा माजी सनदी अधिकारी एकनाथ उर्फ अनिल मोरे यांनी केले. ते सोनू दरेगावकर संपादित उपक्रमशील व्यक्तिमत्त्व हनुमंत भोपाळे गौरव विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष या नात्याने दिनांक १६ ऑगस्ट २०२१ रोजी. लोकमित्र नगर, डी. मार्ट रोड, नांदेड येथे बोलत होते. या गौरव विशेषांकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे, राज्यपुरस्कारप्राप्त शिक्षक पंडित पवळे, इतिहास संशोधक डॉ. साईनाथ शेटोड, साहित्यिक सुभाष पाटील काटकळंबेकर, बाबुराव बस्वदे काटकळंबेकर, राजमुद्रा चॅनेलचे मुख्य संपादक सोमेश्वर लांडगे, व्यंकटराव जाधव, शिवरामजी पांडागळे, एन.जी. सोनकांबळे, जी. वाय. कांबळे गौरव विशेषांकाच्या संपादक मंडळातील सदस्य सुप्रसिद्ध वक्ते पी.बी. वाघमारे, अविनाश बामणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सुंदर असा गौरव विशेषांक प्रकाशित केल्याबद्दल संपादक सोनू दरेगावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले. याप्रसंगी बोलताना गोविंद नांदेडे म्हणाले, डॉ. हनुमंत भोपाळे यांचे उपक्रम समाजासाठी उपकारक आहेत. ज्ञानदीपाची दीपावली हा अभिनव उपक्रम ते गेल्या बावीस वर्षांपासून चालवतात. त्यांनी दहा ग्रंथ लिहिले असून त्यांच्या लेखनाचे स्वरूप प्रेरणादायी आहे. खेडोपाड्यातील मुलांमुलींनी उपक्रमशील हनुमंत भोपाळे ह्या गौरव विशेषांकाचे वाचन केल्यास अनेक प्रेरणा मिळतात, असे प्रतिपादन गोविंद नांदेडे यांनी केले.
पंडित पवळे म्हणाले, मी ज्या ज्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे त्या त्या ठिकाणी डॉ. हनुमंत भोपाळे यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले आहे. त्यांचे मार्गदर्शन बालक आणि पालकांना उपकारक असते. अभ्यासू, कार्यमग्न आणि सुस्वभावी असे हनुमंत भोपाळे यांचे व्यक्तिमत्त्व असून त्यांचे साहित्य आणि प्रबोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले.
शिवाजीराव कपाळे म्हणाले, हनुमंत भोपाळे हे कधीच रिकामं बसत नाहीत. वाचन, लेखन, प्रबोधन, विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करतात आणि वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी असतात.
पी.बी. वाघमारे म्हणाले, डॉ. भोपाळे हा माझा प्रत्यक्ष विद्यार्थी आहे. विद्यार्थी कसा असावा तर हनुमंत भोपाळे यांच्यासारखा असे मी म्हणेन. आज्ञाधारकता, आई-वडील, गुरूजणांविषयी प्रेम हे त्यांचे गुण मी जवळून अनुभवले आहे. त्यांनी पगार नव्हता तेव्हा आईवडिलांच्या आजारात कर्ज काढले, पुतण्यांचे लग्न कर्ज काढून केले, असे योगदान देणारी माणसं दुर्मिळ असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. साईनाथ शेटोड म्हणाले, हनुमंत भोपाळे सरांचा दहा-बारा वर्षांपासून सहकारी आहे.
दोन वेळा प्रभारी प्राचार्य आणि प्राध्यापक या नात्याने त्यांनी राबविलेले उपक्रम उपकारक असे आहेत. महाविद्यालयाची ओळख निर्माण करणारे उपक्रम त्यांनी राबवले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच समाजालाही शिकवण्याचे ते कार्य करतात असे सांगितले. बाबुराव बस्वदे म्हणाले की, हनुमंत भोपाळे हा माणूस गुणांची कदर करणारा आहे. सत्कार सोहळे आयोजित करून विद्यार्थी, समाजातील अनेक गुणी माणसाचे त्यांनी सत्कार केले आहेत.
सुभाष पाटील काटकळंबेकर म्हणाले, हनुमंत भोपाळे यांचे लेखन आणि मार्गदर्शन मला नेहमीच प्रेरणादायी ठरेल आहे. काटकळंब्यात त्यांचे अनेक व्याख्याने आयोजित करण्यात आले होते. माझ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातही त्यांनी केलेले भाषण अविस्मरणीय होते. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन संपादक सोनू दरेगावकर यांनी केले, तर आभार समतादूत विनोद पांचगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, किरण गोईनवाड, कैलास आगलावे, कुणाल भुजबळ, अमोल राऊत, अंकुश सावते, रवी बनसोडे आदींनी परिश्रम घेतले..!
वार्तांकन ;
युवा साहित्यिक: सोनू दरेगावकर, नांदेड..!