नांदेड ; प्रतिनिधी
नांदेडमध्ये लसीकरण सुरू झाले त्या दिवसापासून आजच्या 153 व्या दिवसापर्यंत दररोज धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे लसीकरण घेणाऱ्या नागरिकांना मास्क, सैनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्किट वितरित करण्याचा उपक्रम राबवित असल्यामुळे त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कऱ्हाड यांनी केले.
भाजपा महानगर नांदेडच्या वतीने सेवा ही संघटन या उपक्रमांतर्गत डॉ. कऱ्हाड यांच्या हस्ते मास्क, सैनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्किट साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपिन, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, जन आशीर्वाद यात्रा प्रमुख मनोज पांगरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसिकर, भाजपा वैद्यकीय मोर्चा प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष शिर्शिकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हावगीराव साखरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस व्यंकटराव मोकले हे उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना दिलीप ठाकूर यांनी जोपर्यंत नांदेड शहरात लसीकरण सुरू राहील तोपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. खा. चिखलीकर यांनी मार्गदर्शन करताना भाजपच्या माध्यमातून कोरोना संक्रमण काळात केलेल्या कार्याची माहिती दिली.जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी आपल्या भाषणातून कोरोना संक्रमणाच्या काळात रस्त्यावर उतरून कार्य करण्यामध्ये एकमेव पक्ष भाजपा होता आणि त्यामध्ये दिलीप ठाकूर यांचा सिंहाचा वाटा होता असे सांगितले. चांगले उपक्रम सातत्याने राबवित असल्याबद्दल अर्थ राज्यमंत्र्यांच्या हस्ते दिलीप ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ.कऱ्हाड यांनी लसीकरण केंद्र तसेच ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन भाजपा मंडळ सरचिटणीस कामाजी सरोदे यांनी तर आभार भाजपा व्यापारी आघाडी सरचिटणीस सुरेश निल्लावार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश शर्मा, अरुणकुमार काबरा, प्रशांत पळसकर, राज यादव अक्षय अमिलकंठवार, माधव शिंदे ,बालाजी गायकवाड, सदाशिव सुवर्णकार, शैलेश मोकले, अधीसेविका सुरेखा जाधव व जयश्री वाघ यांनी परिश्रम घेतले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कऱ्हाड यांनी श्रीगुरुजी ऋग्णालयाला भेट दिली त्यावेळी रुग्णालयात गेल्या तीन वर्षापासून दररोज लायन्सचे डबा देण्याचा उपक्रम राबवित असल्याबद्दल तसेच अकरा वर्षात लोकसहभागातून चार लाखापेक्षा जास्त डबे दिल्याबद्दल संयोजक दिलीप ठाकूर यांना रोपटे देऊन सन्मान केला.
(छाया: करणसिंह बैस)