कंधार शहरात मोहरम निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

कंधार ; प्रतिनिधी

कंधार शहरात मोहर्म निमित्त छोटी गल्ली येथील मुस्लिम युवक गेल्या ७ वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. आज शुक्रवार दि.२० ऑगस्ट रोजी छोटी दर्गाह मैदानात संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शेख रब्बानी, शेख अजहर, शेख इरफान व सय्यद मोहसीन मित्र मंडळ तर्फे परीश्रम घेण्यात आले. करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबीराला हमीद सुलेमान ,शेख शेरु,शेख हब्बूभाई आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोहर्रम का ? साजरा करण्यात येतो.

इस्लाम धर्म हा हजरत मोहम्मद पैगंबर (सल्ल.) यांच्या यांच्या शिकवणीनुसार चालतो. इस्लाम धर्मात कुर्बानी ला फार महत्व आहे. इस्लाम धर्माची स्थापना ही कुर्बानी हून सुरू होते व कुर्बानी वरच संपते. हजरत मोहम्मद पैगंबर (सल्ला.) यांचे नातू हजरत हसन रजी. व हजरत हुसैन रजी. यांनी आपल्या आजोबा (नाना) यांनी स्थापन केलेल्या इस्लाम धर्मासाठी बलिदान दिले. त्याच बलिदानाची आठवण म्हणून मोहर्रम साजरा करण्यात येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *