कंधार ; प्रतिनिधी
कोरोनाचे बहुतांश नियम शिथिल झाल्यावर महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरे दर्शना साठी सुरू करणे अपेक्षित होते पण राज्यातील आघाडी सरकारने कुठलीही सकारात्मक भूमिका घेतल्या नसल्याने आज सोमवार दि.३० अॉगस्ट रोजी कंधार भाजपाच्या वतीने घंटानाद व शंखनाद आंदोलन करण्यात आले.
सध्या महाराष्ट्रात सर्व काही व्यव्हार सुरुळीत चालू आहेत त्यात बाजार पेठ ,दारुची दुकान, नेत्यांच्या सभा,ईतर सर्वांना परवानगी आहे शाळा सुद्धा चालू करण्याच्या तयारीत आहेत आणि फक्त मंदिर बंद आणि भजन कीर्तनाला परवानगी नाही.मग मंदिर आणि धार्मिक कार्यक्रमातच कोरोनाची वाढ होते का हा प्रश्न आहे तरी मंदिर उघडावे व भजन कीर्तनाला परवानगी द्यावी यासाठी या मागणी साठी सोमवार दि. ३० रोजी श्री मारोती मंदिर,छत्रपती शिवाजी महाराज चौक, कंधार येथे घंटानाद व शंखनाद करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद व शंखनाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार, शहर सरचिटणीस मधुकर डांगे, भाजपा युवामोर्च्या जिल्हाउपाध्यक्ष निलेश गौर,भाजपा युवामोर्च्या तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे,शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे,माजी नगराध्यक्ष चेतन केंद्रे,नगरसेवक प्रतिनिधी सागर कदम, सोशल मीडिया प्रमुख अड सागर डोंगरजकर, महेश मोरे,प्रवीण बनसोडे,कैलास नवघरे,किशनराव गित्ते,धोंडीबा मुंडे,बालाजी तोरणे, शेखर वाडजकर,माधव जाधव,अभिजित इंदूरकर,अनिल श्रीमंगले,शिवाजी श्रीमंगले,करण गौर,रामदास बाबळे,सुमीत गोरे,शिवा निलेवाड,विकास गायकवाड ,साईनाथ गायकवाड, प्रकाश नवघरे, संदीप गडंबे ,बालाजी तलवारे,मालिकार्जुन स्वामी यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.