समतेचे ते युद्ध चालविण्यासाठी
घेऊन तलवार हाती लढला तो
न्याय हक्कासाठी. अण्णाभाऊंनी
लिहिला फकिरा आमच्या अस्मितेसाठी..!!
इतिहास आमचा लढवय्या शुरांचा
फकिरा सारख्या महानायक वीरांचा
अण्णाभाऊ सारख्या लेखणीच्या हिऱ्याचा
नात हे रक्ताच जग सार आदर्श घेतय..!!
एक नायक फकिरा तो परकीयांच्या
गर्दनीवर घालायचा तलवारीचा घाव
दुसरा नायक अण्णाभाऊ स्वकीय
जातिवाद्यांच्या छाताडावर घालायचा
लेखणीचा घाव..!!
इंग्रज झाले षंढ पाहुनी फकिराच बंड
जातिवाद्यांच्या काळजाला फुटला
घाम पाहुनी अण्णाभाऊंचे लिखान
समतेसाठी लढणारा नायक तो माझा
फकिरा अन् समतेसाठी लिहिणारा
नायक तो माझा अण्णाभाऊ होता..!!
✍🏻सुरज साठे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
वीर फकिरा जन्मभूमी वाटेगाव
9370626619