कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,त्या मुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक गेले आहे अशा परिस्थितीत तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार कंधार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे
कंधार तालुक्यात गत आठ दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला,काहीं ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काहिठिकानी ढगफुटी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे हाती आलेले पीक वाया गेले आहे अशापरिस्थित शासनाच्या वतीने कुठलेही पंचनामे अथवा पाहणी करण्यात आली नाही या उपर विमा कंपनीने ऑनलाईन तक्रार ऍप बंद केले आहे .
अशा परिस्थितीत ऑफलाईन नुकसानभरपाई अर्ज स्वीकारावेत असे निवेदन कुरुळा सर्कल मधील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार कंधार याना दि १सप्टेंबर रोजी केली आहे या निवेदनावर मारोती गवळे,सागर मंगनाळे,विश्वा नावंदे,कैलास शिंदे,राजीव पाटील गायकवाड,तानाजी बनसोडे ,भुजंग चिलपिपरे,योगेश उप्पे,लखन कहाळेकर,राम देवकत्ते,रघुवीर वडजे,आनंद लुंगारे,विष्णू पा.जाधव,व्यंकटेश पेठकर,किरण वडजे,उमाकांत गुट्टे,योगेश पाटील ,लक्ष्मण पवार,अभिजित घोडजकर,बालाजी कदम,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.