कंधार ; प्रतिनिधी
राष्ट्रवादी परिवार संवाद पर्व – 2 या दरम्यान मराठवाडा विभाग दौरात लोहा विधानसभा मध्ये प्रदेशध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील ,आले असता कंधार शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांनी आपल्या सामाजिक,राजकिय कामाचा कार्य अहवाल सादर केला होता.त्यांनी केकाटे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
राजकुमार केकाटे आपण करीत असलेले पक्ष संघटनेचे काम स्तुत्य असून पक्ष संघटनेचे व सामाजिक कार्य असेच अविरत चालू ठेवावे असे कौतुकाची थाप पत्राद्वारे राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांनी दिली आहे.
राजकुमार केकाटे हे सर्वसामान्य लोकांची सेवा करण्यासाठी सदैव तयार असतात.शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे ,युवा नेते दिलीप दादा धोंडगे ,जि.प.सदस्य ॲड.विजय धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली केकाटे यांनी आपले संघटन मजबुतीचे कार्य चालवले आहे.कोरोना काळात योध्दासारखे कार्य करणाऱ्या डॉक्टर ,परीचारीका ,वकील ,पत्रकार मंडळीचा यथोचित सन्मान पक्षाच्या वतीने करुन आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.