कै.शांतीदुत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यानात काटेरी झुडपे ; संयुक्त ग्रुपचे न.पा.मुख्याधिका-यांना निवेदन

कंधार ; प्रतिनिधी

हुतात्मा स्मारक कै.शांतीदुत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यानामध्ये घाणीचे व अस्वच्छतेचे साम्राज्य झाले असून या उद्यानाच्या बाहेरील‌ व आतील भागातील खुप दुरावस्था झाली आहे. उद्यानाच्या बाहेरील व आतील भागात काटेरी झाड़े झुडुपे वाढल्याने अडचणी येत असून तात्काळ पालीका प्रशासनाने उद्यानाची स्वच्छता करावी अशी मागणी संयुक्त ग्रुप कंधार च्या वतीने मुख्याधिकारी न.पा.कंधार यांना करण्यात आली आहे.

त्या उद्यानात पुढे असे नमूद केले आहे की, उद्यानात लहान मुले व वृद्धव्यक्ती या ठिकाणी विसावा घेण्यासाठी येत असतात त्यांना बसण्यासाठी सुरक्षित स्वच्छ जागा नाही.या दुरावस्थेमुळे ह्या ठिकाणी सापांचे प्रमाणही खुप वाढले आहे.त्या कारणात्सव एखाद्या व्यक्ती चा जीव जान्याची शक्यता आहे.त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोणतीही जीवित हाणी होण्यापूर्वी उद्यानाच्या आतील व बाहेरील वाढलेले काटेरी झाडे,गवत व तसेच रोडच्या दुभाजका वरील काटेरी झाडे कापून घेणे गरजेचे आहे.

            कंधार नगरपालीका प्रशासनाने ह्या बाबीकडे लक्ष द्यावे अन्यथा ह्या ठिकाणी दुर्घटना झाल्यास प्रशासन जबाबादार राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर
साईनाथ भगवानराव मळगे
संस्थापक अध्यक्ष संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य,
विजेंद्र कांबळे ( तालुका अध्यक्ष,कंधार ),
राहुल लोहकरे ( शहर अध्यक्ष,कंधार ),
नामदेव डुबुकवाड ( शहर प्रसिद्धि प्रमुख ),
करण पवळे ( संयुक्त विद्यार्थी ग्रुप संपर्क प्रमुख,कंधार ),
दत्ता मोरे ( सदस्य संयुक्त ग्रुप कंधार )आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *