नवीन नांदेड (प्रतिनिधी) – खासदार होऊन आडीच तीन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाला पण विकासनिधी शून्य उपलब्ध करुन दिला. वरुन ते स्वतःला लोकप्रिय म्हणून कसे घेतात असा सवाल खा. चिखलीकर यांच्या संदर्भात उपस्थित करत, फडणवीस सरकारच्या काळात नांदेड मनपाला निधी उपलब्ध झाला नाही यामुळे शहराचा विकास खुटला. दरम्यान महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कोरोना मध्ये वेळ गेला मात्र कोरोना परिस्थितीतून बाहेर येताच पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भरीव विकासनिधी देण्यास सुरवात केल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांनी केले.
सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार (ता.३१) रोजी सिडको येथील कामगार कल्याण केंद्र शिवाजी चौक येथे आ. अमरभाऊ राजूरकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देत आसताना आ. अमरनाथ राजूरकर हे बोलत होते. यावेळी माजी मंत्री डि.पी.सावंत, आ.मोहनराव हंबर्डे, नवनिर्वाचित प्रदेश कमिटी सचिव सुरेंद्र घोडजकर, जिल्हा काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे, जि.प. सदस्य गंगाप्रसाद काकडे, नगरसेवक श्रीनिवास जाधव, राजु काळे, मंगला देशमुख, चित्रा गायकवाड, उदय देशमुख, सिध्दार्थ गायकवाड, संजय मोरे, बापूसाहेब पाटील, डॉ.नरेश रायेवार, सतीश बस्वदे, माधव आंबटवार, बालाजी शिंदे, प्रा. रमेश नांदेडकर, अशोक कलंत्री, डॉ. करुणा जमदाडे समवेत संयोजक ब्लॉक कमिटी अध्यक्ष विनोद कांचनगिरे, प्रा. ललीता शिंदे, शेख असलम, राजु लांडगे, उपस्थित होते. यावेळी सिडको वाघाळा काँग्रेस कमिटी व महिला कमिटीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. पुढे बोलत आसताना आ. अमरनाथ राजूरकर यांनी काँग्रेस पक्षातील स्वतःची वाटचाल सांगत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे जाहीर आभार मानले. सिडको हडकोच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे काम झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आ. मोहनराव हंबर्डे यांनी एकजूटीने काम करत काँग्रेस पक्ष बळकट करण्याचे आवहान काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. अध्यक्ष समारोप माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी करत असताना आरक्षण प्रश्नावर भाजपाची दुप्पटी भूमिका स्पष्ट केली.
यावेळी प्रल्हाद गव्हाणे, तुकाराम झडते, शंकरराव धिरडीकर, आनंदा गायकवाड, संजय श्रीरामे, शेख लतिफ, शेख शैखत, मोईन लाठकर, नारायण कोलबिंकर, शेख हुसेन, माधव आंबटवार, आहदखान पठाण, गिरधर मैड, रसुलभाई चुडिवाले हे उपस्थित होते. काँग्रेस यशस्वी करण्यासाठी नामदेव पदमने, गणेश खंदारे, भगवान जोगदंड, प्रल्हाद जोंगदंड, संजय कदम, अमोल जाधव, देविदास कदम, वैजनाथ माने, शिवाजी कुंभारे, संतोष कांचनगिरे, बालाजी पाटील शिंदे, गणेश काकडे, सौ. कविता चव्हाण, सौ. अनिता गजेगावार, सौ. कविता चौहान, निवृत्ती कांबळे, प्रमोद टेहरे यांच्यासह स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संस्थेचे पदाधिकारी आदीनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी केले.