एक असतो आधार, सोबत कुणीच नसताना!
सर्वांच्या गर्दीतूनही आपली काळजी घेणारा!
कधी आपली आई तर कधी बाबा होणारा!
डोळ्यात पाणी आल्यास आपल्या सोबत रडणारा!
आलं कुणी अंगावर तर पुढे होऊन भिडणारा!
चहाचे पैसे, टपरीची उधारी फेडणारा आणि गरज पडल्यास आपलेही खिसे चाचपडणारा!
कोणत्याही संकटात साथ पूर्ण देणारा,साला; आपल्या घासातून घास भरवणारा!
स्वार्थाने कधीच कुठला सल्ला न देणारा,आणि कुठल्याही नुकसानीत वाटा भरणारा!
नकळत आयुष्याला आकार देणारा,एक सच्चा दोस्त असतो, जिंदगी बदलणारा!
प्रा. नरेश पिनमकर,
निलंगा.