सामाजिक समतेचे पुरस्कर्ते “वामनदादा कर्डक”

सामाजिक समतेचे पुरस्कर्ते  “वामनदादा कर्डक”…….

महाकवी वामनदादा कर्डक हे एक असे व्यक्तिमत्त्व आपल्या भारत देशामध्ये होऊन गेले कि त्यांनी संपूर्ण जीवनात फक्त आणि फक्त सामाजिक बंधुता, धर्मनिरपेक्षता व सामाजिक एकीकरण हे तत्व  समाजामध्ये गीतांच्याद्वारे रुजवण्याचे कार्य केले आहे. आज त्यांच्या गीतांचा नवप्रवाह निर्माण झाल्याचे दिसून येते. गेल्या अनेक दशकांपासून वामनदादा सारखे व्यक्तिमत्त्व या देशामध्ये झालेले नाही. त्यांच्या गीतात एक ऊर्जा आहे. जी ऊर्जा प्रत्येक माणसाच्या जीवनात प्रकाशाची ज्योत निर्माण करते. अशा महाकवी, लोककवी वामनदादा कर्डक यांची ९८ वी जयंती यानिमित्ताने आपणास खूप खूप शुभेच्छा. वामनदादा कर्डक यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ नाशिक जिल्ह्यातील , सिन्नर तालुका,  देशवंडी या गावी झाला.

त्यांच्या घरामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती असताना सतत संघर्षमय जीवन जगले. त्यांच्या वडिलांचे नाव तबाजी कर्डक व आईचे नाव सईबाई असे होते. वामनदादा यांचा  विवाह १९व्या वर्षी  अनुसयाबाई यांच्याशी  झाला.त्याना एक मुलगी झाली तिचे नाव मीरा असे ठेवण्यात आले पण मुलीचे सौख्य त्यांना जास्त काळ लाभले नाही मीरा लवकरच मरण पावली नंतर  पत्नीने सुद्धा त्यांची साथ सोडली. पोटाची खळगी भरण्यासाठी ते मुंबईला आले व कारखान्यांमध्ये काम करायला लागले. कारखान्यातील काम संपल्यानंतर वामनदादा  राणीबागेत बसले असता त्यांना एका हिंदी गीताचे विडंबन सुचले व त्यांनी ते रेखाटले काही लोकांना वाचून दाखवले तेथील लोकांनी त्यांची प्रशंसा केली आणि तेव्हापासून वामनदादा यांचे  कवीत्व जागृत झाले.महाकवी वामनदादा कर्डक यांनी १९४३ पासून गीत लिहिण्यास सुरुवात केली. समाजाच्या हितासाठी समाजाच्या कल्याणासाठी अहोराञ गीत रचून समाजामध्ये जाऊन ते प्रबोधन करायचे. त्यांनी  समाजाच्या अनेक प्रश्नांवर, रुढी परंपरावर, गीताद्वारे प्रहार केले. सामाजिक एकता, बंधुता प्रस्तापित करण्यासाठी कार्य केले.

महाकवी वामनदादा कर्डक यांनी १० हजारापेक्षाही जास्त गीत रचले आहेत. आज आपल्याला मोहळ, तुफानातले दिवे इ. काव्यसंग्रहात ते गीत आपल्याला  पाहायला मिळतात. त्यांचे गीत ऐकायला मिळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार त्यांनी आपल्या गीतातून खेड्यापाड्यात, तांडा,वस्त्या पर्यंत पोहोचवण्याचे महानकार्य  केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक भाषणाचा सार वामनदादा यांनी आपल्या गीतातून अधोरेखित केलेला आज आपल्याला दिसून येतो. महाकवी वामनदादा कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या अथांग ज्ञान सागराचे पाणी समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले आहे.ते म्हणतात
भीम वाणी पडली माझ्या कानी तीच वाणी ठरली माझी गाणी
 या भीम पथाने जाता चिंता ना जीवाची आतागाऊनी भिमाची गाथा सुखवावी जनता मातागाता गाता वामनवाणी जळू बिचारी ज्वानी…खरं म्हणजे आपल्या भारत देशातील लोकांना आज घडीला वामनदादा यांचे कार्य समजून सांगावे लागेल. कारण आपल्या समाजामध्ये अनेकजण महाकवी वामनदादा कर्डक यांना नुसते भीमशाहिर म्हणून ओळखतात. अनेक जण असे म्हणतात की वामनदादा यांनी फक्त बाबासाहेबांचे गाणे म्हटलेले, लिहिलेले आहे पण मला आज समाजाला सांगावसं वाटतं की वामनदादा यांनी नुसते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी लिहिलेली नाहीत त्यांनी संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.त्यांनी समाजिक  प्रश्नांना वाचा फोडली. स्त्री-भ्रूणहत्या, स्त्री सशक्तीकरण , लोकगीत , पोवाडे, चित्रपट गीत,  देशभक्तीपर गीत यासारख्या  अनेक गीत प्रकारांवर वामनदादांनी गीत रचना करून भारत देशातील समाज व्यवस्थेला एक दिशा देण्याचे  महान कार्य केले आहे. वामनदादांनी समाजामध्ये जागृती केली व अज्ञान दूर करण्यासाठी या गीतांच्याद्वारे समाजामध्ये परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित केली आहे. खरंच मित्रांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो लोक क्रांतीचा रथ इथ पर्यंत आणला. त्या रथाचे पाईक असलेले वामनदादा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जाणीव आपल्या गीतातून करून देतात.  त्या काळात डॉ. बाबासाहेबांना सहकार्य करणारे लोक आपल्या देशात असते तर या देशाचे चित्र वेगळे पहावयास मिळाले असते.


भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते. तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते वाणीत भीम आहे करणीत भीम असतावर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. महाकवी वामनदादा कर्डक हे सदा चिंतनशील व आशावादी व्यक्तिमत्त्व होते. या भारतीय समाजव्यवस्थेला अनेक राजकारणी, धनी लोकांनी व चोरांनी वेगवेगळ्या प्रकारे पोखरून पोखरून खाल्लेले आहे पण वामनदादांना आशा होती की भारत देशातील लोक एक ना एक दिवस बदलतील व ज्या लोकांनी या देशाला लुबाडण्याचे कार्य केले त्यांना प्रश्न विचारण्याचे बळ त्यांच्यात येईल ते पुढे म्हणतात की.आज नही तो कल जमाना बदलेगानही चलेगा जोर यहाँ धन चोरोका धीरे धीरे यहाँ कमजोर अरे बढ जायेगा बल जमाना बदलेगा आज नही तो कल जमाना बदलेगावामन जैसे गीत के लिखने वालो को भुक से जीना सीखने वालो कोमिल जायेगा फल जमाना बदलेगा आज नही तो कल जमाना बदलेगा.यावरून आपण अनुमान लावू शकता की वामनदादा सुद्धा दूरदृष्टी असणारे संगीतकार, गीतकार होते. ते पुढे चालून देशभक्तीपर गीत लिहितात महापुरुषांवर गीत लिहितात.


जवानो तन बदन और मन वतन के वास्ते दे दो! किसानो अन्न का कण कण वतन के वास्ते दे दो!आमीरो तुम तुम्हारा धन वतन के वास्ते दे दो!छुपाना छोड दो कांचन वतन के वास्ते दे दो!खजाना खोल दो सब धन वतन के वास्ते दे दो!
यहा फिर से कोई राजपूत राणाजैसा पैदा हो!गुरु गोविंदजी, रणजीतजी, गाजीसा पैदा हो!वतन पे हो फिदा नरवीर सा पैदा हो!अकेला हो तो हजारो में बाजी प्रभू सा पैदा हो!शिवाजी बनके तुम दर्शन वतन के वास्ते दे दो!जवानो तन बदन और मन वतन के वास्ते दे दो!मित्रांनो यावरून आपल्याला लक्षात घ्यायला हवे की वामनदादा काही एका समाजापुरते मर्यादित नव्हते त्यांनी तळागळाचा विचार करून आपल्या गीतरचना लिहिलेल्या आहेत व समाजापुढे एक आदर्श ठेवलेला आहे. वामनदादांच्या प्रत्येक गीतामध्ये धगधगती आग आहे आणि ती आग माणसाच्या मनाला सतत परिवर्तनाच्या प्रकाशात घेऊन जाण्याचे कार्य करते.आज महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जीवनावर अनेक जण अभ्यास करत आहेत पी.एचडी करत आहेत. यामध्ये वामनदादा कर्डक यांचे शिष्य डॉ. संजय मोहड यांनी नाशिक विद्यापीठातून वामनदादा कर्डक यांच्यावर पी.एचडी केलेली आहे. त्याचबरोबर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठातून महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १० हजार गीतातून निवडक १०० गीतांचा ‘गीत भीमायन’ हा जागतिक उच्चांक प्राप्त करणारा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. गीत भीमायन प्रकल्पाची विशेषता म्हणजे यामध्ये भारतातील नामवंत सुप्रसिद्ध कलाकार आपल्याला दिसून येतील. त्यामध्ये हरीहरण ,कविता कृष्णमूर्ती, रवींद्र साठे, सुरेश वाडकर, आरतीताई अंकलीकर, रघुनंदन पणशीकर, सावनी शेंडे, मनीषा पाटील, बेला शेंडे शुभा जोशी इ. कलावंत प्रथमतः या ‘गीत भीमायन’ महाप्रकल्पांमध्ये  एकत्रित आपल्याला ऐकायला मिळतील. संपूर्ण ‘गीत भीमायन’ प्रकल्पाचे संगीत डॉ. संजय माधवराव मोहड यांनी दिले आहे व संगीत संयोजन कट्यार काळजात घुसली, ख्वाडा, मुळशी पॅटर्न या चित्रपटाचे संगीत संयोजक नरेंद्र भिडे हे करत आहेत. मित्रांनो महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या ८१ वर्षाच्या जीवन प्रवासामध्ये समाजाला एकीकरणाची, बंधुभावाची व सामाजिक सलोख्याची भावना प्रस्थापित करण्यासाठी जी गीतांद्वारे सेवा दिली त्या सेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.१) दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप२) महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार३) औरंगाबाद येथे भव्य पहिला नागरी पुरस्कार४)हिंगोली जिल्ह्यातील वसमत या गावी डॉ. संजय मोहड यांनी आयोजित केलेल्या ‘स्वरार्हत संगीत संगीती’ या कार्यक्रमांमध्ये नागरी सत्कार५) मुंबईचा बुद्ध कलावंत संगीत अकादमीचा भीमस्तुती पुरस्कारअशा या महाकवीचे गुण सांगावे तेवढे कमीच आहे. पण वामनदादांच्या शेवटच्या क्षणाला अनेक लोकांनी त्यांना पाठ दाखवली, एकट्यात सोडून गेले.पण महाकवी वामनदादा यांनी कधीच आपली सेवा देणे सोडली नाही. त्यांच्या सेवेचे  ऋण आपण विसरताकामा नये. आज वामनदादा हयात नसले तरी त्यांच्या गीतातून  अजरामर होऊन आज घराघरांमध्ये  पोहोचलेले आहेत.  जोपर्यंत  जिवंत राहिले ते समाजाला प्रेरणादायी गीत देत राहिले जाता जाता सांगून गेले.
माणसा तू आज भीमाचे डोळे घे.
प्रकाशणारे मोठे मोठे गोळे घे.ज्या डोळ्यांनी वाट आम्हाला दाविली,पोरं आमची त्या वाटेला लाविली तेजाचे गोड मधाचे पोळे घे.
(१)आवरणारे वामन सावरणारे जगात साऱ्या ममतेने वावरणारे मानवतेचे प्रतीक साधे भोळे घे…(२)माणसा तू आज भीमाचे डोळे घे.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..

प्रा.योगेश शिवाजी गच्चे (कामधेनू बीएड कॉलेज, औरंगाबाद)

       ह. मु  नांदेड

मो.नंबर – ९५९५५२६७९५.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *