मातंग समाजाच्या विद्रोह धरणे आंदोलनास कंधारात प्रतिसाद

कंधार ; प्रतिनिधी

   कंधार तालुक्यातील गऊळ येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा हटवलेला पुतळा  पुन्हा बसवणे प्रकरणी प्रशासनाकडून दिलेले आश्वासन पुर्ण न झाल्याने व आरोपींवर गुन्हे दाखल न झाल्याने कंधार तालुका सकल मातंग समाजाच्या वतीने आज बुधवार दि.१५ सप्टेंबर रोजी कंधार तहसिल कार्यालयासमोर आयोजित  विद्रोह धरणे आंदोलनास समाज बांधवासह सर्व जातीधर्मातील कार्यकर्त्यांने हजेरी लावून भरभरुन प्रतिसाद दिला.

प्रशासनाकडून हटवलेला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा सन्मानपूर्वक गऊळ येथिल नियोजित त्याच जागेवर बसविण्यात यावा यासाठी दि.१५ सप्टेबंर बुधवार रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते.

यावेळी तहसिलदार यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.निवेदनावर मौजे गऊळ येथिल समाजावर लाठीचार्जची सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावी ,साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा हटवलेला पुतळा सन्मानाने बसवण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेले आश्वासन पुर्ण करावे,तसेच मातंग समाजाच्या तरुणांवर दाखल झालेले गून्हे तात्काळ मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

मामा मित्र मंडळाचे संस्थापक मारोती मामा गायकवाड,लोकस्वराज्य आंदोलन संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे, लहुजी शक्ती सेना विभागीय उपाध्यक्ष प्रितम गवाले,अविनाश अंबटवार, मालोजी वाघमारे ,पंडीत देवकांबळे,सचिन पेठकर,साईनाथ मळगे,राजू मळगे,हनमंत घोरपडे,वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले,पं.स.सदस्य उत्तम चव्हाण ,भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार,पांडूरंग दाढेल,संदीप नवघरे धानोरकर,संभाजी वाघमारे ,विजेद्र कांबळे ,बसवंते,जाधव,वाघमारे ,कांबळे,मोरे,घोडजकर, आदीसह मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *