कंधार ; प्रतिनिधी
मौजे संगमवाडी ता कंधार आगार चे रहिवासी श्री टी. जी.घुगे लहानपणापासून अतिशय कष्टकरी, मेहनती ,इनामदार, प्रेमळ, माणुसकीचा मुर्तीमंत झरा आहेत . त्यांनी याच मेहनत व प्रामाणिक पणामुळे ते आज कौटुंबिक स्तरावर अतिशय उज्वल, सुखी ,समाधानी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत.
ते सद्या MSRTC मध्ये वाहक या पदावर कार्यरत आहेत. बस मध्ये त्यांना आतापर्यंत कित्येक जणांच्या वस्तू सापडल्या पण त्यांना कसल्याही प्रकारचा मोह आला नाही .त्यांनी त्या वस्तू प्रामाणिकपणे त्यांना बोलून परत दिल्या याचे एक उदाहरण कंधार माळेगाव यात्रा असतेवेळी त्यांना एका माणसाची पैशाची पिशवी सापडली त्यात 35000 रुपये एवढी रक्कम होती त्यांनी ती पिशवी त्यांना बोलून घेऊन परत केली .
दुसरं म्हणजे दिनांक17/09/2021 रोजी कंधार -नागपूर ड्युटीवर वाहक म्हणून कर्तव्य करीत असताना आश्विनी हजारे या ताईचा उमरखेड येथे मोबाईल vio – 33 जो तब्बल 18000 रू चा नवीन मोबाईल बसमध्ये कंडक्टर श्री .टि .जी .घुगे साहेब यांना सापडला होता तो त्यांनी ज्या ताईचा हरवलेला मोबाईल होता त्यांना खात्री करून उमरखेड येथे परत केला .
यावेळी सदर मोबाईल परत मिळालेल्या आश्विनी हजारे या ताईंनी उमरखेडला श्री. टि. जी. घुगे साहेब यांना 1000 रू. नगदी बक्षीस म्हणून देत असताना वाहक श्री. टि .जी. घुगे साहेब यांनी नम्रपणे नाकारत ते 1000 रू . बहीण मानुन साडी-चोळी करा दिपावली साठी म्हणून परत दिले .
यावेळी त्यांचा उमरखेड चे वाहतूक नियंत्रक साहेबांनी ईनानदारीचे फलीत म्हणून खास यथोचित सन्मान करीत सत्कार केला.